काही तरी वेगळं करून दाखवण्यासाठी तिनं केली आत्महत्या

By Admin | Updated: May 3, 2016 19:49 IST2016-05-03T19:49:14+5:302016-05-03T19:49:14+5:30

एका मुलीनं चक्क काही तरी नवं करून दाखवण्यासाठी आत्महत्या केली आहे.

Suicide to show somebody differently | काही तरी वेगळं करून दाखवण्यासाठी तिनं केली आत्महत्या

काही तरी वेगळं करून दाखवण्यासाठी तिनं केली आत्महत्या

 ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. 3- अनेकदा दुष्काळाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात, तर काही मानसिक दडपणातून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र कानपूरमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका मुलीनं चक्क काही तरी नवं करून दाखवण्यासाठी आत्महत्या केली आहे.
आत्महत्येपूर्वी त्या मुलीनं एक चिठ्ठीही लिहिली आहे. त्या चिठ्ठीत तिनं 'मी आनंदी असल्यानं आत्महत्या करत आहे. माझे पालक कायम माझ्यासोबत असतील. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. ही आत्महत्या म्हणजे माझ्यासाठी एक थरार असून, काही तरी वेगळं केल्याचा अनुभव असेल', असं लिहिलं आहे.
कानपूरमधल्या बरा सेक्टर 8 मध्ये राहणारी अनुष्का सिंग 12वी इयत्तेत शिकत होती. कानपुरातल्या हरमिलाप मिशन शाळेतून दहावीला तिनं 94 टक्के गुण मिळवून यश संपादन केलं होतं. तिचे वडील उपेंद्रसिंग इन्कम टॅक्स विभागात इन्स्पेक्टर आहेत. ती खून आनंदी होती, तिच्या आयुष्यात कोणतंही टेन्शन नव्हतं, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. 
 

Web Title: Suicide to show somebody differently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.