्रपुण्यातील युवकाची नाशकात आत्महत्त्या
By Admin | Updated: March 21, 2015 00:03 IST2015-03-20T22:40:06+5:302015-03-21T00:03:36+5:30
नाशिक : पुणे येथील युवकाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ राकेश रवींद्रनाथ नायर (३७, रा़ सुखकार कॅम्प, वैशालीनगर, पिंप्री, पुणे) असे आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ सिडकोतील अनुषा हॉटेलमध्ये त्यांनी खोली घेतली होती़ गुरुवारी(दि़१९) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला़ या घटनेची माहिती शरद पवार यांनी अंबड पोलिसांना दिली़ दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)