शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 09:55 IST

पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलासही प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला

प्रयागराज - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला सील केलं आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलासही प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रयागराजच्या जॉर्ज टाऊनमध्ये याप्रकरणी आयपीसी 306 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी 11.30 वाजता महंत नरेंद्र गिरी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्ताने अयोध्येत शोककळा पसरली आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनीही नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती पसरताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलीस प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास करणार आहेत.

बऱ्याच काळापासून तणावाखाली होते. 

महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे.

शिवसेनेकडून सीबीआय तपासाची मागणी 

नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचे दिसून येते. पालघरच्या साधूंवरील हत्येचा ज्याप्रमाणे नि:पक्षपातीपणे तपास झाला, त्याप्रमाणे हाही तपास व्हावा असेही राऊत यांनी म्हटले.   

टॅग्स :Narendra Maharajनरेंद्र महाराजCrime Newsगुन्हेगारीShiv SenaशिवसेनाHinduहिंदूSanjay Rautसंजय राऊत