साखर महागणार
By Admin | Updated: August 23, 2014 00:11 IST2014-08-23T00:11:34+5:302014-08-23T00:11:34+5:30
सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साखर महागणार
नवी दिल्ली : सरकारने कच्च्या आणि शुद्ध साखरेवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेची चव महाग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळ अर्थात सीबीईसीने या संदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार, कच्ची व शुद्ध साखर यावरील आयात शुल्क वाढवून 25 टक्के केले आहे. वाढीव आयात शुल्क कच्च्या साखरेची आयात करणा:या ठोक ग्राहकांवरही लागू होईल. जनहितास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला आहे.अन्न मंत्रलयाच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, ‘मंत्रलयाने आयात शुल्क वाढवून 4क् टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अर्थ मंत्रलयाने यात किरकोळ वाढ केली. साखर कारखानदारांना काहीसा दिलासा देत महागाईचा पारा आणखी वाढेल या भीतीने आयात शुल्कात अल्पशी वाढ केली आहे.’
ग्राहक व्यवहार मंत्रलयाच्या आकडेवारीनुसार, साठा शिल्लक असतानाही देशांतर्गत बाजारात सध्या साखरेचा भाव 34 ते 4क् रुपये प्रतिकिलोदरम्यान आहे. साखरेचे भाव कारखान्यातील उत्पादन खर्चापेक्षा खाली गेल्याने कारखानदारांपुढे रोखीचे संकट निर्माण झाले. याचा कारखानदारांच्या नफ्यावरही परिणाम झाला.
उद्योगाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात कारखानदार प्रतिकिलो 3क्.5क् रुपये दराने साखर विक्री करत आहेत. याउलट त्यांना साखर उत्पादनासाठी 37 रुपये खर्च करावे लागतात. याचप्रमाणो महाराष्ट्रातील कारखानदारांकडून 28.5क् रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री केली जाते. यासाठी उत्पादन खर्च 31 रुपये प्रतिकिलोर्पयत येतो.
भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्माने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या निर्णयामुळे कारखान्यांकडील रोखीचा प्रवाह वाढेल
आणि शेतक:यांची देणी चुकती करणो शक्य होणार असल्याचे इस्माद्वारे सांगण्यात आले.
इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, सध्याचे जागतिक दर आणि रुपया-डॉलर यांचे विनिमय दर यांच्या आधारावर आयात शुल्कात वाढ केल्याने साखरेची आयातही कमी होईल. यामुळे देशी बाजार स्थितीत सुधारणा होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्साखरेवरील आयात शुल्कात वाढ झाल्याने आयात महाग होईल. परिणामी आयातीमध्ये घट होईल. याचा काही परिणाम देशांतर्गत पातळीवर साखरेचा भाव वाढल्याने ग्राहकांवरही पडेल. मात्र दुसरीकडे रोखीच्या संकटाचा सामना करत असलेल्या साखर कारखानदारांना काहीसा दिलासा मिळेल.
च् साखर कारखानदार देशातील ऊस शेतक:यांचे 6,8क्क् कोटी रुपये देणो आहे. जागतिक बाजारातील स्वस्त साखरेचा लाभ उठवत भारतात थोडय़ाबहुत प्रमाणात साखरेची आयात होत असते.