शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सुफी गायक हंसराज हंस यांना शेतकऱ्यांचा घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:48 IST

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती

बलवंत तक्षक

चंडीगड : सुफी गायक आणि भाजपचे उमेदवार हंसराज हंस यांना पंजाबच्या शेतकऱ्यांनी फरीदकोटमध्ये घेराव घातला. भाजपने हंस यांना फरीदकोटमधून उमेदवारी दिली आहे. हंस यांचा ताफा येताच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत कसेबसे शेतकऱ्यांना तेथून हटवले. 

आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे तर रद्द केले. मात्र, त्यावेळी मान्य केलेल्या अटी अद्यापही लागू केलेल्या नाहीत. या अटींची आठवण करून देण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांचा हरयाणाच्या सीमेवर छळ करण्यात आला. विदेशी नागरिक असल्याप्रमाणे वागणूक दिली गेली, अशा आरोपांच्या अनेक फैरी झाडून शेतकऱ्यांनी हंस यांना निरुत्तर केले.

अद्याप प्रचाराला वेग नाही यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. फरीदकोटमध्ये आतापर्यंत केवळ भाजपनेच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतरच येथील निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. मात्र, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हंस यांना शेतकऱ्यांच्या सततच्या विरोधाला सामोरे जावे लागणार हे निश्चित.

टॅग्स :BJPभाजपाHaryanaहरयाणाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Farmerशेतकरी