अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30

अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले

The sudden rain receded | अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले

अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले

काळी पावसाने पुन्हा झोडपले
औरंगाबाद : आठवडाभरापासून सातत्याने कोसळणार्‍या अवकाळी पावसाने शनिवारी पुन्हा औरंगाबादला झोडपले. रात्री ८ वाजेनंतर शहरात सर्वत्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात १ मार्चपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. तसेच काही भागात गारपीटही झाली. त्यानंतर आज दुसर्‍या दिवशीही रात्री ७ वाजेनंतर संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी दाटून आले. थोड्याच वेळात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्वच भागांत हा पाऊस पडत होता. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत ६.४ मि. मी. पावसाची नोंद झाली. तर शनिवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.४ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे चिकलठाणा वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आले.
बसस्थानकाजवळ झाड पडले
अवकाळी पावसासोबत शहरात वादळी वारेही वाहत होते. या वार्‍यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाजवळील निलगिरीचे एक मोठे झाड तुटून रस्त्यावर पडले. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही. अग्निशमन विभागाच्या पथकाने रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचून हे झाड बाजूला केले.

Web Title: The sudden rain receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.