देशात अचानक होणारे मृत्यू 12 टक्क्यांनी वाढले; हार्ट अटॅकसोबतच 'ही' गोष्ट ठरतेय कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 03:08 PM2023-12-07T15:08:10+5:302023-12-07T15:08:56+5:30

देशात अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनांनी लोक हैराण झाले आहेत. डॉक्टर आणि ICMR सारख्या संस्था देखील याचे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Sudden deaths increased 12 percent in india main reason heart attack and brain | देशात अचानक होणारे मृत्यू 12 टक्क्यांनी वाढले; हार्ट अटॅकसोबतच 'ही' गोष्ट ठरतेय कारणीभूत

देशात अचानक होणारे मृत्यू 12 टक्क्यांनी वाढले; हार्ट अटॅकसोबतच 'ही' गोष्ट ठरतेय कारणीभूत

गेल्या काही वर्षांत देशात अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनांनी लोक हैराण झाले आहेत. डॉक्टर आणि ICMR सारख्या संस्था देखील याचे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून समोर आले आहे की, 2022 मध्ये सुमारे 57 हजार लोकांचा अचानक मृत्यू झाला. यापैकी 57 टक्के प्रकरणे अशी होती ज्यात लोकांना हार्ट अटॅक आला होता. NCRB नुसार, अशा प्रकारे 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनसीआरबी राज्य पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वार्षिक अहवाल तयार करते. आकस्मिक मृत्यूंमध्ये अशी प्रकरणे आहेत ज्यात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस आकस्मिक मृत्यूंना अनपेक्षित मृत्यू मानतात, ज्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू हिंसेव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे झाला. जर आपण अचानक मृत्यूच्या कारणाबद्दल बोललो तर, हार्ट अटॅक शिवाय ब्रेन हॅमरेज हे देखील एक प्रमुख कारण आहे. गेल्या महिन्यात एका अभ्यासात असे सांगण्यात आले होते की, अचानक होणारा मृत्यू आणि कोरोना लस यांचा काही संबंध नाही.

कोरोनाची लस घेणारे लोक आकस्मिक मृत्यूचे बळी ठरत आहेत अशी चर्चा होती. त्यानंतर ICMR ने अशा प्रकरणांचा अभ्यास केला आणि अहवालात हे चुकीचे असल्याचे आढळले. आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच सल्ला दिला होता की ज्यांना कोरोना आहे त्यांनी काही वर्षे जास्त मेहनत आणि हाय इन्टेन्सिटी असलेला व्यायाम करू नये. NCRB म्हणते की, 2022 मध्ये एकूण 3.9 लाख मृत्यूंपैकी 13.4 टक्के मृत्यू अचानक झाले. यातील एक तृतीयांश लोक 45 ते 60 वयोगटातील होते.

गेल्या वर्षी अचानक होणाऱ्या मृत्यूची संख्या ही महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 14,927 होती. याशिवाय केरळमध्ये 6,607 आणि कर्नाटकात 5,848 लोकांच्या मृत्यू झाला. आजारामुळे किंवा घरी अचानक हार्ट अटॅक आल्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांची पोलिसांत नोंद होत नाही. त्यामुळे हा आकडाही कमी असू शकतो. गेल्या वर्षीही या राज्यांची क्रमवारी अशीच होती. आकडेवारी दर्शवते की 2022 मध्ये हार्ट अटॅकने 32,410 मृत्यू झाले. 
 

Web Title: Sudden deaths increased 12 percent in india main reason heart attack and brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.