पीएसएलव्हीद्वारे 5 विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

By Admin | Updated: July 1, 2014 02:30 IST2014-07-01T02:30:39+5:302014-07-01T02:30:39+5:30

अंतराळ क्षेत्रत एक आणखी मोठी ङोप घेत भारताने आज सोमवारी पीएसएलव्ही-सी 23 या स्वदेशी प्रक्षेपण यानाने (रॉकेट) पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल़े

Successful launch of 5 foreign satellites by PSLV | पीएसएलव्हीद्वारे 5 विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

पीएसएलव्हीद्वारे 5 विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

>श्रीहरिकोटा (आंध्र) : अंतराळ क्षेत्रत एक आणखी मोठी ङोप घेत भारताने आज सोमवारी पीएसएलव्ही-सी 23 या स्वदेशी प्रक्षेपण यानाने (रॉकेट) पाच विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल़े पंतप्रधान नरेंद्र मोदी या गौरवपूर्ण क्षणाचे साक्षीदार बनल़े शेजारी देशांना भेट म्हणून समर्पित करण्यासाठी भारतीयांनी आता ‘सार्क’ उपग्रह विकसित करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केल़े
येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रथम प्रक्षेपण तळावरून सकाळी 9 वाजून 52 मिनिटाला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पीएसएलव्ही-सी23 हे प्रक्षेपण यान पाच विदेशी उपग्रहांसह अवकाशात ङोपावले आणि 17 ते 19 मिनिटांत या पाचही उपग्रहांना 
त्याने त्यांच्या निर्धारित कक्षेत 
सोडल़े
 या यशस्वी उड्डाणानंतर श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रात उपस्थित असलेल्या मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केल़े राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शास्त्रज्ञांचे अभिनंदन करीत हा देशासाठी गौरवपूर्ण क्षण असल्याचे म्हटल़े
हे आहेत पाच विदेशी उपग्रह
पीएसएलव्ही-सी 23 ने ज्या पाच विदेशी उपग्रहांना सोबत घेऊन उड्डाण केले, त्यात फ्रान्सचा 714 किलो वजनाचा स्पोत-7 हा भू-निरीक्षण उपग्रह, जर्मनीचा 14 किलो वजनाचा ‘एसैट’, कॅनडाचा एनएलएसल 7़1 (कॅन-एक्स 4) आणि एनएलएस 7़2 (कॅन-एक्स4) तसेच सिंगापूरचा वेलोक्स-1 या उपग्रहांचा समावेश आह़े कॅनडाचे दोन्ही उपग्रह प्रत्येकी 15 किलो वजनाचे तर सिंगापूरचा 7 किलो वजनाचा आह़े 
प्रक्षेपणास विलंब
मोहीम सज्जता समीक्षा समिती आणि प्रक्षेपण बोर्डाने गत शुक्रवारीच पीएसएलव्ही-सी 23 च्या प्रक्षेपणास मंजुरी दिली होती़ मात्र आज ऐनवेळी पूर्वनियोजित वेळेत बदल करण्यात आला़ 
प्रक्षेपण यानाच्या मार्गात ‘कथित अंतराळ कचरा’आल्यामुळे वेळ बदलण्यात आली व हे उड्डाण तीन मिनिट विलंबाने झाल़े (वृत्तसंस्था)
 
4भारताने 1975 पासून 4 एप्रिल 2014 र्पयत 74 भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. हे उपग्रह विविध प्रकारचे आहेत. प्रारंभीच्या काळात भारताने अमेरिका, रशिया व युरोपियन देशांच्या प्रक्षेपण यानांचा वापर करून आपले उपग्रह प्रक्षेपित केले होते. कालांतराने भारताने स्वत:चे प्रक्षेपण यान विकसित केले. अंतराळ क्षेत्रत वर्चस्व असलेल्या प्रमुख देशांत आज भारताचा समावेश होतो.
 
4 इस्त्रोने 1999 पासून आतार्पयत 35 परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण केले असून, यातील बहुतांश उपग्रह हे विकसित देशांचे होते. आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अधिक देश आपल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी भारताशी संपर्क साधतील.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हिंग्लीश’मधून भाषण
4रविवारीच श्रीहरिकोटा येथे पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएसएलव्ही-सी 23 या भारताच्या महत्त्वाकांक्षी उड्डाणाचे साक्षीदार बनल़े प्रक्षेपण 
यान अवकाशात ङोपावताच मोदींनी सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या़ 
नरेंद्र मोदींनी इंग्रजीतून भाषणाला सुरुवात केली़
4 यानंतर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ते इस्नेच्या शास्त्रज्ञांचा गुणगौरव करताना दिसल़े इस्नेच्या शास्त्रज्ञांमुळेच भारताने उपनिषद ते उपग्रह असा पल्ला गाठला़ आजचा हा क्षण संपूर्ण देशासाठी गौरवाचा आणि अभिमानाने ऊर भरून येण्याचा क्षण आह़े
 
4 आता मी आपल्याला व अंतराळ समुदायाला एक सार्क उपग्रह विकसित करण्याचे आवाहन करतो़ सार्क देशांतील गरिबी आणि निरक्षरतेवर मात करण्याची गरज आह़े या देशांना या जोखडातून बाहेर काढेल, त्यांच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांना मदत करेल, असा भारत समर्पित करू शकेल असा उपग्रह बनविण्याचे आव्हान इस्नेने स्वीकारावे, असे मोदी यावेळी म्हणाल़े 
 
4 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एऩ चंद्राबाबू नायडू, आंध्रचे राज्यपाल इएसएल नरसिम्हन तसेच केंद्रीय नगरविकासमंत्री एम़ वेंकय्या नायडू हेही यावेळी उपस्थित होत़े
 
उपग्रहांचे वैशिष्टय़
4 फ्रान्सचा आज प्रक्षेपित करण्यात आलेला स्पोत-7 हा उपग्रह 
स्पोत-6 च्या एकदम विरुद्ध दिशेने स्थापित करण्यात आला़ स्पोत-6 ला इस्नेने 2क्12 मध्ये प्रक्षेपित केले होत़े युरोपियन अंतराळ तंत्रज्ञान कंपनी ‘एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेस’ने स्पोत-7 ची निर्मिती केली होती़ 
4 जर्मनीचा एसैट उपग्रह जागतिक जलवाहतूक टेहळणी व्यवस्थेवर केंद्रित राहील़ हा जर्मनीचा पहिला डीएलआर उपग्रह आह़े
4 कॅनडाचे दोन्ही उपग्रह एनएलएस 7़1 आणि एनएलएस 7़2 ला टोरंटो युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिटय़ूट ऑफ एअरोस्पेस स्टडीज/स्पेस फ्लाईट लेबॉरेटरीने विकसित केले आहेत.
4 सिंगापूरच्या नायनांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीकडून विकसित उपग्रह वेलोक्स-1 मध्ये इमेज सेन्सर लागलेले आहेत़

Web Title: Successful launch of 5 foreign satellites by PSLV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.