जीवन शिक्षण विद्यालयाचे यश

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

वाघापूर : कूर (ता. भुदरगड) येथील जीवन शिक्षण मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय अपंग क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले.

The success of life learning school | जीवन शिक्षण विद्यालयाचे यश

जीवन शिक्षण विद्यालयाचे यश

ल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ६१ थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया अवसायक मंडळाने सुरू केली आहे. या थकबाकीदारांकडे सुमारे सात कोटींची येणे बाकी असून, ते वसुलीला अजिबात प्रतिसाद देत नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. ही लिलाव प्रक्रिया १२ ते २० जानेवारी दरम्यान केली जाणार आहे.
भुदरगड पतसंस्थेच्या ठेवींचे वाटप न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. दहा हजारपर्यंतच्या ठेवींचे वाटप अंतिम टप्प्यात आहे. ठेवीदार पैशांसाठी पतसंस्थेचे उंबरे झिजवत असताना कर्जदार मात्र निवांत आहेत. अवसायक मंडळाने नेमलेल्या वसुली अधिकार्‍यांनी वसुलीचा प्रयत्न केला; पण त्याला थोडाही प्रतिसाद या थकबाकीदारांनी दिला नाही. परिणामी, अवसायक मंडळाने संबंधित थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. पतसंस्थेच्या गारगोटी शाखा क्रमांक १, गारगोटी शाखा क्रमांक २, आजरा व साईक्स एक्स्टेन्शन या चार शाखांकडील ६१ थकबाकीदारांच्या वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तेची लिलाव प्रक्र्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया १२ ते २० जानेवारीअखेर राबविली जाणार आहे. या ६१ थकबाकीदारांकडे तब्बल सात कोटींची थकबाकी असून, तिच्या वसुलीसाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.
चौकट -
जबाबदारांच्या मालमत्तेचा लिलाव
ज्यांच्या कार्यकतृर्त्वाने पतसंस्था अडचणीत आली, त्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली आहे, अशा दहाजणांकडून वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. २० ते २४ जानेवारीदरम्यान लिलाव प्रक्रिया राबविली आहे.
बहुतांश स्थावर मालमत्ता
सर्वच ६१ थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्ता तारण आहेत; त्यामुळे लिलावाला तरी कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
शाखानिहाय थकबाकीदारांची संख्या
गारगोटी शाखा १ - २४
गारगोटी शाखा २ - १४
आजरा शाखा - ११
साईक्स एक्स्टेन्शन शाखा - १२

Web Title: The success of life learning school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.