शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाविरोधातील लढाईत केंद्राला मोठं यश, स्विस बँकेने दिली महत्त्वपूर्ण माहिती

By बाळकृष्ण परब | Updated: October 9, 2020 22:28 IST

black money news : स्वित्झर्लंडसोबत माहितीच्या ऑटोमॅटिक हस्तांतरणाबाबत झालेल्या करारानुसार भारताला ही माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देभारतीय नारगिक आणि कंपन्यांच्या स्वीस बँकेतील खात्यांची दुसरी यादी स्वीस बँकेने भारत सरकारला दिली स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या वर्षी ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन फ्रेमवर्क अंतर्गत भारतासह ८६ देशांमधील खात्यांसंबंधीची माहिती पुरवली आहेस्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी गेल्या एक वर्षात १०० हून अधिक भारतीय नागरिक आणि कंपन्यांची माहिती दिली आहे

नवी दिल्ली - काळ्या पैशाविरोधातील लढाईत केंद्र सरकारला मोठं यश मिळालं आहे. भारतीय नारगिक आणि कंपन्यांच्या स्वीस बँकेतील खात्यांची दुसरी यादी स्वीस बँकेने भारत सरकारला दिली आहे. स्वित्झर्लंडसोबत माहितीच्या ऑटोमॅटिक हस्तांतरणाबाबत झालेल्या करारानुसार भारताला ही माहिती मिळाली आहे. काळ्या पैशाविरोधातील लढाईच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश म्हणून या यादीकडे पाहिले जात आहे.स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या वर्षी ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन फ्रेमवर्क अंतर्गत भारतासह ८६ देशांमधील खात्यांसंबंधीची माहिती पुरवली आहे. भारताला एईओआय अंतर्गत सप्टेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा स्वीस बँकेतील खात्यांचे विवरण दिले होते. भारताला एईओआय अंतर्गत सप्टेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा स्विस बँकेतील खात्यांसंदर्भातील माहिती मिळाली होती. त्यावेळी स्विस एफटीएने ७५ देशांसोबत विवरण शेअर केले आहे.एफटीएने शुक्रवारी दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले की, इन्फॉर्मेशन एक्सचेंजअंतर्गत या वर्षी ३१ लाख वित्तीय खात्यांची माहिती देण्यात आली आहे. गतवर्षी एवढ्याच खात्यांची माहिती दिली होती. एफटीएने आपल्याकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यामध्ये भारताचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही. मात्र स्वित्झर्लंडने स्विस बँक खात्यांसंबंधीची माहिती दिलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी स्वित्झर्लंडकडून ८६ देशांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या ३० लाखांहून अधिक खात्यांमध्ये भारतीय नागरिकांच्या आणि कंपन्यांच्या खात्यांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान, स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी गेल्या एक वर्षात १०० हून अधिक भारतीय नागरिक आणि कंपन्यांची माहिती दिली आहे.

 

टॅग्स :black moneyब्लॅक मनीSwiss Bankस्विस बँकIndiaभारतSwitzerlandस्वित्झर्लंड