पैठण : येथील आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत ७ सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके पटकावली. यंदाच्या ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणित विषयामध्ये ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कास्यपदके पटकावली आहेत. यात पार्थ भास्कर कुलकर्णी, श्रीराम पंढरीनाथ फुलझलके, वैभव रवींद्र देसले, आदित्य जनार्दन दराडे, पल्लवी रंधे, सानिका कुलकर्णी, वैभव पांगरे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. श्रेयस दिलीप छबीलवाड, रोहित विसरे, खुशी टोकशा यांनी रौप्य, तर रोहित लांडगे, वैष्णवी मोहिते, चैताली कुलकर्णी यांनी कास्यपदक पटकावले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष डॉ. राम लोंढे, डॉ. जयंत जोशी, डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुफळे, नंदकिशोर मालानी, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी व शालेच्या शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
पिशोरला दहा दिवसांत १८७ मी.मी. पावसाची नोंदपिशोर : पिशोरसह परिसरात गेल्या १० दिवसांत पडलेल्या दमदार पावसाने शिवार चिंब झाले असून, नदी नाल्यंाना पूर येऊन विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. १० दिवसांतील पावसाची १८७ मि.मी. इतकी नोंद घेण्यात आली आहे. अंजना पळशी मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी तीन टक्क्यांनी वाढली असून, आज प्रकल्पात ४१ टक्के इतका पाणीसाठा असल्याचे सिंचन विभागाचे कालवा निरीक्षक टी.एस. जाधव व ए.बी. मनगटे यांनी सांगितले. परिसरातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.