शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निकृष्ट दर्जाचे काम; आमदाराने हात मारला अन् कॉलेजची अख्खी भिंत कोसळली; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 14:38 IST

या घटनेनंतर आमदार संतापले आणि त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण प्रकार सांगितला, तसेच सरकारवर जोरदार टीकाही केली.

प्रतापगड: भ्रष्टाचारातून तयार झालेल्या बांधकामाची गुणवत्ता किती खराब असू शकते, हे उत्तर प्रदेशातील एका घटनेवरुन सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे बांधकाम सुरू असलेल्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेले समाजवादी पक्षाचे आमदार आरके वर्मा यांनी बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार आरके वर्मा यांनी स्वत:च्या हाताने भिंत ढकलल्याने संपूर्ण भिंतच कोसळली.  प्रतापगढच्या राणीगंज विधानसभेच्या शिवसात जंगलात बांधल्या जाणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेले सपा आमदार डॉ. आरके वर्मा आले होते. यावेळी त्यांना विटा निघत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी एका हातानेच उभ्या भिंतीला धक्का दिला अन् अख्खी भिंतच कोसळली. यावेळी त्यांनी 'महाविद्यालय नाही, तर स्मशानभूमी बनवली जात आहे', अशी टीका केला. 

यानंतर सपाचे आरके वर्मा संतापले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण प्रकार सांगितला. यावर ग्रामीण अभियांत्रिकी सेवेच्या अभियंत्यांनी घाईघाईने घटनास्थळ गाठले आणि वर्मा यांच्यासमोर बांधकामाचा नमुना प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सपा आमदार आरके वर्मा म्हणाले की, 'अशा निकृष्ट बांधकामामुळे सरकार तरुणांचे भविष्य तयार करत नाही, तर त्यांच्या मृत्यूची व्यवस्था आहे. राणीगंज विधानसभेत बांधल्या जाणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील भ्रष्ट सरकारी यंत्रणेचे दर्शन.  

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी