सुब्रतो रॉय यांना दिलासा, 24 ऑक्टोबरपर्यंत पॅरोलला मुदतवाढ

By Admin | Updated: September 28, 2016 18:52 IST2016-09-28T18:52:18+5:302016-09-28T18:52:18+5:30

हारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांची पॅरोल रजा 24 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली

Subroto Roy gets relief, Parole extended till October 24 | सुब्रतो रॉय यांना दिलासा, 24 ऑक्टोबरपर्यंत पॅरोलला मुदतवाढ

सुब्रतो रॉय यांना दिलासा, 24 ऑक्टोबरपर्यंत पॅरोलला मुदतवाढ

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28- सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांची पॅरोल रजा 24 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, यासोबतच न्यायालयाने त्यांना सेबीकडे 200 कोटी रूपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
सर्वोच्च न्यायालयाने रॉय यांच्या वकिलाकडे 12 हजार कोटींची भरपाई कशी करणार याचं उत्तर मागितलं आहे व याबाबत पथदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या वर्षी मे महिन्यात रॉय यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता तेव्हापासून ते पॅरोलवर आहेत.
 
दोन वर्षांपुर्वी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी  4 मे 2014 ला रॉय यांना अटक करण्यात आली होती. 

Web Title: Subroto Roy gets relief, Parole extended till October 24