शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

निवडणूक रोख्यांचा तपशील मंगळवारीच सादर करा; सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 05:59 IST

आयोगाने सर्व माहिती १५ मार्चला प्रसिद्ध करावी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांचा तपशील भारतीय स्टेट बँकेने १२ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर करावा. आयोगाला ते १५ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. गेल्या २६ दिवसांत तुम्ही काय केले? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेएसबीआयला फटकारले.

एसबीआयने रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला ६ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीला दिले होते, पण १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या २२ हजार २१७ रोखे निवडणूक रोख्यांविषयीची माहिती डिजिटल स्वरूपात साठवलेली नाही. ती उपलब्ध करून देण्यास वेळ जाणार असल्याने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी एसबीआयने केली होती.

मुदतीचे पालन न केल्यास अवमान

निवडणूक रोख्यांसंबंधात जो तपशील द्यायचा आहे, ते स्टेट बँकेकडे सहज उपलब्ध आहे. निवडणूक रोख्यांसंबंधीची माहिती तंतोतंत जुळावी, असे आम्ही सांगितलेले नव्हते. दिलेल्या आदेशाची तुम्ही अंमलबजावणी करा. तुम्हाला फक्त सीलबंद असलेली माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवायची आहे. मुदतीत आदेशांचे पालन न केल्यास हा न्यायालयाचा हेतुपुरस्सरपणे केलेला अवमान समजून कारवाई केली जाईल, असा सज्जड दम न्यायालयाने दिला.

एसबीआयचे शेअर्स २.१६% घसरले : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवरून फटकारल्यानंतर स्टेट बँकेचे शेअर ७७१ रुपयांनी (२.१६%) घसरला. तसेच आजच्या सत्रात स्टेट बँकेच्या शेअरला ७०९ रुपयांचा लोअर सर्किट लागला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाState Bank of Indiaस्टेट बॅक ऑफ इंडिया