सीमाप्रश्न संपलेला विषय : सिद्धरामय्या
By Admin | Updated: August 18, 2014 03:49 IST2014-08-18T03:49:09+5:302014-08-18T03:49:09+5:30
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा सीमाप्रश्नासंबंधी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजविले आहे.

सीमाप्रश्न संपलेला विषय : सिद्धरामय्या
बेळगाव : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा सीमाप्रश्नासंबंधी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजविले आहे. बेळगावचा सीमाप्रश्न हा विषय संपलेला असून, यासंबंधी महाजन आयोगाचा अहवाल हा अंतिम आहे, असे मत त्यांनी रविवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी हा प्रश्न त्यांच्या स्वार्थासाठी जिवंत ठेवला असल्याची टीकाही त्यांनी केली.
चिकोडी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या बेळगावात आले होते. येळ्ळूर घटनेनंतर ते येथे पहिल्यांदाच आले होते. महाराष्ट्र सरकारने सीमाभागासाठी स्वतंत्र पालकमंत्री नेमणे कायद्यात बसत नाही. महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर त्याला विरोध करून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
काही कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेऊन महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)