सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात नाही - स्वामी

By Admin | Updated: January 10, 2015 19:50 IST2015-01-10T19:50:42+5:302015-01-10T19:50:42+5:30

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता असा खळबळजनक दावा भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

Subhash Chandra Bose's death is not an accident - owner | सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात नाही - स्वामी

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात नाही - स्वामी

>ऑनलाइन लोकमत 
कोलकाता, दि. १० - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता असा खळबळजनक दावा भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. केंद्र सरकार लवकरच बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फाईल सार्वजनिक करेल असेही त्यांनी म्हटले आहे.  
भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी कोलकाता येथील एका कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयी भाष्य केले. 'नेताजी यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करणा-या मुखर्जी आयोगाला अमेरिकेने एक पत्र पाठवले होते. यामध्ये तैवानमध्ये कोणताही विमान अपघात झाला नसून तेथील कोणत्याही रुग्णालयात जळालेल्या मृतदेहांचा रेकॉर्ड आढळलेला नाही असे या पत्रात म्हटले होते असा दावा स्वामी यांनी केला. यावरुन या विमान अपघाताची गोष्ट बनावट असून नेताजी १९४७ मध्ये जीवंत होते व नेहरुंनाही याविषयीची माहिती होती असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. 

Web Title: Subhash Chandra Bose's death is not an accident - owner