उपनगरच्या पोलीस हवालदारास लाच घेताना पकडले
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:42+5:302015-09-03T23:05:42+5:30
नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजारांची मागणी करून दहा हजार रुपये घेताना उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश आप्पाजी सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़

उपनगरच्या पोलीस हवालदारास लाच घेताना पकडले
न शिक : धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजारांची मागणी करून दहा हजार रुपये घेताना उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश आप्पाजी सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांनी त्यासाठी कर्ज काढलेले होते़ या कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने इगतपुरी न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी तर नाशिकरोड मोटार वाहन न्यायालयानेही अजामीनपात्र वॉरंट काढले होते़ या दोन्ही वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे काम उपनगरचे पोलीस हवालदार सुरेश सोनवणे यांच्याकडे होती़ तक्रारदारास या दोन्ही प्रकरणांमध्ये अटक न करण्यासाठी सोनवणे यांनी २० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले़ यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळा लावण्यात आला़ सोनवणे यांनी तक्रारदाराकडून उपनगर बस स्टॅण्डच्यामागे आशर कॉलनी रोडवर दहा हजार रुपयांची रक्कम घेतली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणी सोनवणे यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)