शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

विदेशात शिक्षणासाठी न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच सुविधा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 3:11 AM

विद्यार्थ्यांच्या कमतरतेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अभियांत्रिकी कॉलेजेसना संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.

एस.के. गुप्ता नवी दिल्ली : भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी विदेशात शिकण्यासाठी जातात. त्यात विशेषकरून अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन व कॅनडा यांचा समावेश आहे. आता कोरोनाच्या भीतीमुळे विदेशात जाऊ न शकणाºया विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कमतरतेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अभियांत्रिकी कॉलेजेसना संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयात याबाबत नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात आली होती. त्याबाबत एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, जेईई मेन्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख काही काळासाठी वाढविण्यात आली. कोरोनाच्या उद्रेकामुळे विदेशात शिक्षणाची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याच देशात अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून येथील संस्थांमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. सध्या जेईई मेन्सच्या परीक्षेसाठी २५ हजार नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यामुळे एकूण विद्यार्थ्यांची संख्या ८.५० लाखांवर गेली आहे. यामुळे बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही संजीवनी मिळणार आहे. अशा महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील व विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयांत शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी विदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणाची संधी देण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ ही योजना सुरू केली होती. भारत सरकारने दरवर्षी यात ५० हजार विदेशी विद्यार्थ्यांना शिकविण्याची ही योजना बनवली होती.>उच्च गुणवत्तेची विद्यापीठे उघडावी लागतील -पोखरियालकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ‘लोकमत’बरोबर केलेल्या विशेष बातचीतमध्ये सांगितले की, भारतातील सुमारे ७.५ लाख विद्यार्थी विदेशात शिकतात. अशा विद्यार्थ्यांना तसेच इतर विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च गुणवत्तेची खाजगी व सरकारी विद्यापीठे उघडावी लागतील. ‘स्टडी इन इंडिया’ अंतर्गत विदेशी व देशातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणात उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पोखरियाल यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या कठीण स्थितीने प्रत्येक क्षेत्रातील लोकांचे जीवन प्रभावित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भूमीत- भारतात- शिक्षण घेण्याची तसेच काम करण्याची इच्छा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेकडे जात आहे.