विद्यार्थ्यांनी केले केरींना प्रभावित

By Admin | Updated: July 31, 2014 23:43 IST2014-07-31T23:43:48+5:302014-07-31T23:43:48+5:30

अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी गुरुवारी प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या(आयआयटी) दोन प्रयोगशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Students influence Kerry done | विद्यार्थ्यांनी केले केरींना प्रभावित

विद्यार्थ्यांनी केले केरींना प्रभावित

नवी दिल्ली : अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी गुरुवारी प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या(आयआयटी) दोन प्रयोगशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा ते चांगलेच प्रभावित झाले. हा अनुभव अतिशय रोमांचक आणि उत्कृष्ट असा होता या शब्दात त्यांनी या भेटीची प्रशंसा केली.
भारत-अमेरिका सामरिक चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी केरी भारतात आले आहेत. त्यांनी वेळ काढून अप्लाईड मायक्रोबॉयोलॉजी आणि बायो- प्रोसेस प्रयोगशाळेचा दौरा केला. केरी यांची प्रयोगशाळांना भेट देण्याची इच्छा असल्याचे अमेरिकन दूतावासाने खास करून कळविले होते, असे आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. आर.के. शेवगावकर यांनी सांगितले. निळ्या रंगाचा सूट परिधान केलेल्या केरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना प्रक्रिया, शैक्षणिक शुल्क, पेटंट व्यवस्थेबाबत प्रश्न विचारले. भारतातच नोकरी करणार की, बाहेर असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. जैविक पद्धतीने नष्ट केल्या जाऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या संशोधन प्रकल्पाबद्दल केरी यांनी समाधान व्यक्त केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Students influence Kerry done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.