शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दहावीच्या विद्यार्थीने संस्कृतच्या उत्तरपत्रिकेत लिहिली ब्लू व्हेल गेमच्या फायनल स्टेजची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:43 IST

मध्यप्रदेशातील रायगढ जिल्हात मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमसंदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील रायगढ जिल्हात मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमसंदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्लू व्हेल गेमच्या फायनल टास्कमुळे घाबरलेल्या एका दहावीच्या मुलाने त्याच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत ब्लू व्हेल गेमच्या फायनल टास्कची भीती लिहून काढली आहे.ब्लू व्हेलच्या फायनल टास्कमध्ये जेव्हा त्या मुलाला आत्महत्या करायला सांगितलं गेलं तेव्हा तो मुलगा प्रचंड घाबरला होता.

भोपाळ, दि. 22- मध्यप्रदेशात मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमसंदर्भात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तेथे ब्लू व्हेल गेमच्या फायनल टास्कमुळे घाबरलेल्या एका दहावीच्या मुलाने त्याच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत ब्लू व्हेल गेमच्या फायनल टास्कची भीती लिहून काढली आहे. ब्लू व्हेलच्या फायनल टास्कमध्ये जेव्हा त्या मुलाला आत्महत्या करायला सांगितलं गेलं तेव्हा तो मुलगा प्रचंड घाबरला होता. भीतीने त्याने ती संपूर्ण घटना उत्तरपत्रिकेत लिहिली. उत्तरपत्रिका तपासत असताना शिक्षकाला हे प्रकरण समजल्यावर त्यांनी ही संपूर्ण माहिती शाळा प्रशासनाला दिली. मुलाने उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या घटनेनंतर त्या विद्यार्थ्याला आता योग्य मार्गदर्शन केलं जात आहे. 

उत्कृष्ट विद्यालय खिलचीपूरच्या दहावी इयत्तेच्या तिमाही परीक्षेच्या वेळी संस्कृतचा पेपर सुरू असताना या विद्यार्थ्याने ब्लू व्हेलविषयी उत्तरपत्रिकेत लिहिलं. 'मी ब्लू व्हेल गेमच्या 49 व्या स्टेजवर पोहचलो आहे. आता माझ्यावर आत्महत्या करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. तसंच आत्महत्या केली नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारलं जाईल, अशी धमकी दिली जाते आहे. असं त्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे, असं खिचलीपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण प्रजापती यांनी सांगितलं आहे. या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेची तपासणी जेव्हा हेमलता श्रृंगी या करत होत्या. तेव्हा त्यांना उत्तरपत्रिका वाचून धक्का बसला. त्या मुलाने लिहिलेली संपूर्ण घटना वाचल्यावर त्यांनी शाळा प्रशासनाला त्याबद्दल सांगितलं. शाळेमध्ये सध्या शिक्षक आणि  इतर काही जणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन केलं जात आहे. विद्यार्थ्याच्या मनात असलेली ब्लू व्हेलबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 

ब्लू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्लू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणतर्‍ 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते.  शेवटी खेळणार्‍याल आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही!या गेममध्ये होतं काय की  सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतर्‍ला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उडय़ा मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेल