त्या विद्यार्थ्याचे अपहरण झालेच नाही

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:33+5:302015-08-12T23:54:33+5:30

त्या विद्यार्थ्याचे अपहरण झालेच नव्हते

The student was not kidnapped | त्या विद्यार्थ्याचे अपहरण झालेच नाही

त्या विद्यार्थ्याचे अपहरण झालेच नाही

या विद्यार्थ्याचे अपहरण झालेच नव्हते
नागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने स्वत:चे अपहरण झाल्याचे सांगितल्याने पोलिसांची झोप उडाली होती. परंतु त्याचे अपहरण झाले नसल्याची माहिती पुढे आल्याने पोलीस आणि त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. १७ वर्षीय विद्यार्थ्याचे वडील पोलीस विभागात छायाचित्रकार आहेत. विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी वडिलांना एसएमएस करून त्याचे अपहरण झाल्याची माहिती दिली होती. काही वेळानंतर त्याने वडिलांना फोन करून सिद्धेश्वर सभागृहाजवळून त्याचे अपहरण करण्यात आल्याची माहिती दिली होती. पोलिसांना त्याच्या सांगण्यावर अगोदरपासूनच संशय होता. त्यांनी अधिक सखोलपणे त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने खरा प्रकार कबूल केला. त्याने सांगितले की, तो काही दिवसांपासून तणावात आहे. त्यामुळेच त्याने अपहरणाचे नाट्य रचले. त्याने स्वत:लाच जखमी केल्याचेही कबूल केले.

Web Title: The student was not kidnapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.