सरकारी रुग्णालयात विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार
By Admin | Updated: January 8, 2015 16:35 IST2015-01-08T16:35:46+5:302015-01-08T16:35:46+5:30
भिलाई येथील एका सरकारी रुग्णालयात एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने छत्तीसगडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारी रुग्णालयात विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
बिलासपूर, दि. ८ - भिलाई येथील एका सरकारी रुग्णालयात एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने छत्तीसगडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा बलात्कार दोन पोलीस शिपाई आणि एका डॉक्टरने केला असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. एका नर्सने या तरुणीला भुल दिली होती. त्यानंतर एका डॉक्टरसह दोन पोलीस शिपायांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. आरोपींनी धमकवल्याने पिडीत तरुणी या घटनेची तक्रार करण्यास घाबरत होती. परंतू, या आरोपींनी पिडीत तरुणीला ब्लॅकमेल करत पुन्हा तिच्यावर केलेल्या अत्याचारांना तिने अखेर वाचा फोडली. पिडीत तरुणीने दिलेल्या माहितीनुसार दोन पोलीस शिपाई आणि डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.