शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Inspirational: तरुणाची कमाल, स्वतःच विटा बनवून बांधले मातीचे घर! उन्हाळ्यात ‘एसी’चीही नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 07:37 IST

तामिळनाडूतील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने पूर्ण मातीचे घर बांधले आहे. या घरासाठी त्याने मातीच्याच कच्च्या विटा बनवून त्यांचा वापर केला.

पेरांबलूर :

तामिळनाडूतील एका तरुण सिव्हिल इंजिनिअरने पूर्ण मातीचे घर बांधले आहे. या घरासाठी त्याने मातीच्याच कच्च्या विटा बनवून त्यांचा वापर केला. जिथे गरज असेल तिथेच, पण खूप कमी सिमेंट आणि लोखंडी सळ्या वापरल्या. हे घर सर्व हवामानाचा सामना करू शकते, उन्हाळ्यात घरात एअर कंडिशनिंगची गरज पडत नाही कारण घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते. 

पेरांबलूर जिल्ह्यातील वेप्पानाथताई येथील ३० वर्षांच्या ए. जगदीश्वरनचे लहानपणापासूनच सिमेंट आणि लोखंडी सळ्यांशिवाय घर बांधायचे स्वप्न होते. यासाठी त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुद्दुचेरी येथील खासगी महाविद्यालयात कॉम्प्रेस्ड स्टेबिलाइज्ड अर्थ ब्लॉक्स (सीएसईबी) आणि आर्क वॉल्ट डोम (एव्हीडी)चा कोर्स केला. 

चेन स्प्रॉकेटचा वापर- विटांना आधार देण्यासाठी जगदीश्वरनने पाया आणि कमानीमध्ये थोड्या सळ्यांचा वापर केला. - पण रॉड्सऐवजी, खिडक्या आणि समोरच्या गेटसाठी दुचाकीच्या चेन स्प्रॉकेटचा वापर करण्यात आला. मी हे तंत्र इतर कोठेही वापरले नाही असेही त्यांनी सांगितले. - तसेच दरवाजे, पायऱ्या किंवा खिडक्यांसाठी नवीन लाकूड विकत न घेता पॉलिश केलेले जुने लाकूड खरेदी केले.

गुहेच्या आकाराचे घर; २०,००० लिटर क्षमतेची टाकी - जगदीश्वरनने गुहेच्या आकाराचे घर बांधले आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी २०,००० लिटर क्षमतेची टाकी उभारली, टेरेस गार्डनही आहे. घर लाल मातीचे बनलेले आहे आणि सर्व हवामानाचा सामना करू शकते. - विशेष म्हणजे घरात एअर कंडिशनिंगची गरज नाही. तसेच रंग देण्याचीही आवश्यकता नाही कारण त्याचा नैसर्गिक रंग चमकतो. पारंपरिक तंत्रज्ञानापेक्षा हे घर १० टक्के अधिक महाग आहे. पण त्यासोबतच नावीन्यपूर्ण, वेगळे आणि टिकाऊदेखील आहे.

विटा बांधण्यासाठी वापरली लाल माती 1. जगदीश्वरन यांनी २०२१ मध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लाल माती गोळा केली. 2. मातीमध्ये अगदी कमी सिमेंटचा वापर करून कच्च्या विटा तयार केल्या आणि गरम न करताच वापरल्या. ११०० चौरस फुटांच्या घरात विविध तंत्रांचा वापर करण्यात आला. छतही १०,००० विटांनी बनवल्याचं ते सांगतात. 3. विटांमधील अंतर कमी करण्यासाठी सिमेंटऐवजी लाल मातीच्या पावडरचा वापर केला. टाइल्सऐवजी त्याच विटांचा वापर फरशीसाठीही करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी