शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

चिंताजनक! शाळेत प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्याला हार्ट अटॅक; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 06:03 IST

आरोग्याची काळजी न घेणे बेततेय जिवावर

नवी दिल्ली - २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाल्याने आता वयाच्या केवळ १७व्या वर्षी दहावीतील विद्यार्थ्यांचा शाळेत प्रार्थना सुरू असतानाच हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाला. अनियमित दिनचर्या आणि आपण जे दररोज बाहेरील अन्नपदार्थ खातो, त्यामुळे हृदयविकाराला आमंत्रण मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एका अभ्यासानुसार, भारतात ३ कोटींहून अधिक लोक हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रासले आहेत. भारतात दर ३ सेकंदाला एका व्यक्तिचा हृदयविकाराने मृत्यू होत आहे. यामध्ये ५० टक्के लोक ५० वर्षांवरील आहेत. २५ टक्के लोक ४० वर्षांचे आहेत, तर यापेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्याही वाढत आहे.

हार्ट अटॅकच्या काही घटनातेलंगणातील खम्मम जिल्ह्यात सोमवारी ३१ वर्षीय तरुणाचा जिमनंतर मृत्यू झाला. खम्मममध्ये रविवारी ३३ वर्षीय नागराजू यांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात तेलंगणातील जगतियालमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तिचा मृत्यूआंध्र प्रदेशातील बापटला येथे मार्च महिन्यात एका शाळेतील शिक्षकाचा मुलांना शिकवताना हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये, बॅडमिंटन खेळताना २८ वर्षीय व्यक्तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. २५ फेब्रुवारी रोजी एका १९ वर्षीय मुलाचा लग्नात डान्स करताना मृत्यू झाला होता. जिममध्ये व्यायाम करताना २४ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. हळदी समारंभात एका तरुणाला चक्कर आली आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला होता.

नशेमुळे हृदयाचे मायकार्डियल स्नायू कमकुवत होऊ लागतात. या स्नायूंपासूनच हृदय तयार होते. या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे, हृदयाच्या ठोक्याचा वेग असामान्य होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हार्ट अटॅकची प्रमुख कारणे...धूम्रपान करणे, जंकफूडचे सेवन करणे, मद्यपानामुळे वाढते ब्लडप्रेशर, जास्त काम, सतत तणाव

१८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण सिगारेट आणि दारूचे सेवन करू लागले आहेत, जे हृदयविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भोपाळमध्ये एका १७ वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Healthआरोग्य