बनावट मोबाईल विक्री करणार्या विक्रेताला अटक
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30
पुणे : बनावट मोबाईल विक्री केल्याप्रकरणी मुंबई, मुसाफिरखाना येथील एका विक्रेत्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. यायालयाने दोघांना २० ऑगस्टपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

बनावट मोबाईल विक्री करणार्या विक्रेताला अटक
प णे : बनावट मोबाईल विक्री केल्याप्रकरणी मुंबई, मुसाफिरखाना येथील एका विक्रेत्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. यायालयाने दोघांना २० ऑगस्टपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.उमेशकुमार ऊर्फ सतिश अनुप सिंग (वय ४०, रा. वडाळा, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी प्रशांत रावसाहेब जगताप (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसंगी, ता. हवेली, मूळ. श्रीगोंदा जि. अहमदनगर) याला शुक्रवार पेठ येथील हिराबाग झोपडपी येथून ११ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून ३६ बनावट मोबाईल आणि घड्याळे असा एकूण ८ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. जगताप हा एका वेबसाईटवर नामांकित कंपनीचे मोबाईल असल्याचे सांगत बनावट मोबाईल विकत होता. पोलीस कोठडीत त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने मुंबई येथून उमेशकुमार याच्या दुकानातून बनावट मोबाईल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी उमेशकुमार याला अटक केली, तर पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जगताप या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांच्याकडे आणखी बनावट मोबाईलचा साठा आहे का, बनावट मोबाईल विक्री करणार्यांची टोळी आहे का, याबाबत तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने दोघांना २० ऑगस्टपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.