शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मलप्पुरम स्फोट प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती

By admin | Updated: November 3, 2016 13:54 IST

केरळमधील मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या बाँम्बस्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
 तिरुवनंतपुरम, दि. 3 - केरळमधील मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या बाँम्बस्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राइव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही मंत्र्यांची छायाचित्रे तसेच बाबरी मशीद पाडतानाचे व्हिडिओ आढळून आले आहेत. तसेच दादरी येथे झालेल्या अखलाखच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अजून बॉम्बस्फोट घडवले जातील, अशी धमकी देण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. 
मंगळवारी मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या आवारात कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता.  या स्फोटाच्या तपासादरम्यान  घटनास्थळावरून एक पेन ड्राइव्ह आणि पत्र जप्त करण्यात आले होते. या पेन ड्राइव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी,  काही मंत्री आणि भाजपाच्या काही नेत्यांची छायाचित्रे आढळली आहेत. तसेच गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे झालेल्या अखलाख याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा उल्लेख येथे सापडलेल्या पत्रात आहे. 
(केरळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारमध्ये स्फोट) 
(ISISशी संबंधित 6 जणांना केरळमधून अटक)
यंदाच्या वर्षात केरळमध्ये घडलेली ही बॉम्बस्फोटाची दुसरी घटना असून, याआधी जून महिन्यात  कोल्लम मधील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अशाच प्रकारे स्फोट घडवून आणण्यात आला होता. दरम्यान, केरळ सरकारने या स्फोटाच्या चौकशीसाठी  विशेष पथकाची नियुक्ती केली असून,हा स्फोट तामिळनाडूस्थित अल-उम्माह या दहशतवादी संधटनेने केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.