शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

तामिळ विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 4:45 AM

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची परीक्षा तामिळ भाषेतून दिलेल्या विद्यार्थ्यांना चुकीचे भाषांतर केलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी सरसकट चार गुण देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली.

नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची परीक्षा तामिळ भाषेतून दिलेल्या विद्यार्थ्यांना चुकीचे भाषांतर केलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी सरसकट चार गुण देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. या आदेशामुळे तामिळ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकूण १९६ वाढीव गुण द्यावे लागणार होते.माकपचे राज्यसभा सदस्य टी. एम. रंगराजन यांच्या याचिकेवर मद्रास हायकोर्टाने गेल्या आठवड्यात हा आदेश दिला होता. परीक्षा घेणाऱ्या सीबीएसईने याविरुद्ध केलल्या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होईल.ज्या प्रश्नांचे तमिळ भाषांतर चुकीचे होते त्यांची विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे बरोबर आहेत की चूक हे न पाहता, प्रश्न सोडविला म्हणून त्यासाठी प्रत्येकी चार गुण देणे चुकीचे आहे. वाढीव गुणांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसेल, असे खंडपीठाने नमूद केले.एका प्रश्नात ‘चित्ता’ या शब्दाचे ‘सीता’ हे भाषांतर केल्याचा उल्लेख करून न्या. बोबडे म्हणाले की, यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असणार. पण प्रत्येक चुकीच्या भाषांतरित प्रश्नासाठी सरसकट वाढीव गुण देणे योग्य नाही. तामिळनाडूनही इंग्रजीतून परीक्षा देणाºयांवरही हा अन्याय आहे.‘सीबीएसई’तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी सांगितले की, हायकोर्टाच्या या आदेशामुळे ‘नीट’च्या निकालानंतरची पुढील सर्व प्रक्रिया विस्कळित होऊन ठप्प झाली आहे. सरसकट १९६ वाढीव गुण दिल्याने यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे गुण परिक्षेच्या एकूण गुणांहूनही जास्त होणार आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.>तज्ज्ञाची मदत घ्याभविष्यात पुन्हा असा घोळ होऊ नये यासाठी, मूळ् प्रश्नपत्रिका आणि तिचे विविध भाषांमधील भाषांतर तयार झाल्यावर ते अचूक असल्याची तज्ज्ञांच्या समितीकडून तपासून खात्री करून घ्यावी. तसेच यासाठी काही तरी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी सूचना खंडपीठाने केली. ‘सीबीएसई’ने सांगितले की, प्रस्तुत प्रकरणात मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे भाषांतर करण्यासाठी भाषांतरकार तमिळनाडू सरकारनेच दिले होते. एवढेच नव्हे तर तमिळसोबत विद्यार्थ्यांना मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकाही दिली होती. शंका आल्यास त्यांनी तो प्रश्न इंग्रजीशी ताडून पाहणे अपेक्षित होते.