'कठोर कारवाई करावी...', कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिराच्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 13:56 IST2025-03-09T13:56:06+5:302025-03-09T13:56:24+5:30

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाला. या प्रकरणी आता भारताने निषेध व्यक्त केला आहे.

Strict action should be taken India strongly condemns the vandalism of a Hindu temple in California | 'कठोर कारवाई करावी...', कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिराच्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध

'कठोर कारवाई करावी...', कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिराच्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील बीएपीएस हिंदू मंदिरात तोडफोडीची घटना समोर आली आहे. यासोबतच मंदिरावर आक्षेपार्ह संदेश लिहिले होते. बीएपीएसच्या सोशल मीडियावरुन ही माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असेही अधोरेखित केले की ते कधीही द्वेषाला मूळ धरू देणार नाहीत आणि शांती आणि करुणा कायम राहील, दरम्यान आता या तोडफोडीच्या घटनेवरुन भारताने निषेध व्यक्त केला आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल

बीएपीएसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, "आणखी एका मंदिराच्या विटंबनानंतर, कॅलिफोर्नियातील चिनो हिल्समधील हिंदू समुदाय द्वेषाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील समुदायासोबत, आम्ही कधीही द्वेषाला मूळ धरू देणार नाही. आमची सामायिक मानवता आणि श्रद्धा शांती आणि करुणा कायम राहील याची खात्री करेल, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

भारताने निषेध व्यक्त केला

भारताने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून संबंधीतांवर "कठोर कारवाई" करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील एका हिंदू मंदिराच्या तोडफोडीचे वृत्त आम्ही पाहिले आहे. आम्ही अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो." 

"स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत जे जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली असून प्रार्थना स्थळांवर सुरक्षा पुरवण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. 

उत्तरी अमेरिकेतील हिंदू संघटनांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कॅलिफोर्नियातील प्रतिष्ठित बीएपीएस मंदिराची विटंबना लॉस एंजेलिसमधील तथाकथित खलिस्तान जनमत संग्रहच्या आधी झाली आहे. या पोस्टमध्ये २०२२ पासून मंदिरांच्या तोडफोडीच्या इतर अलीकडील घटनांची यादी देण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

CoHNA ही एक तळागाळातील वकिली संस्था आहे जी उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्माची समज सुधारण्यासाठी आणि हिंदू समुदायाला प्रभावित करणाऱ्या समस्यांसाठी समर्पित आहे.

CoHNA ही एक तळागाळातील वकिली संस्था आहे. ही उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्माची समज सुधारण्यासाठी आणि हिंदू समुदायाला प्रभावित करणाऱ्या समस्यांसाठी समर्पित आहे. 

गेल्या वर्षीही मंदिर तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या, २५ सप्टेंबरच्या रात्री कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. न्यू यॉर्कमधील बीएपीएस मंदिरात अशाच प्रकारची घटना घडल्यानंतर १० दिवसांपेक्षा कमी वेळात ही घटना घडली.

Web Title: Strict action should be taken India strongly condemns the vandalism of a Hindu temple in California

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.