रस्त्यावर केरकचरा दुर्गंधीचे साम्राज्य

By Admin | Updated: May 8, 2014 14:42 IST2014-05-08T14:42:31+5:302014-05-08T14:42:31+5:30

दंडात्मक कारवाईची मागणी : मनपा आरोग्य विभाग

Street crochet deodorant empire | रस्त्यावर केरकचरा दुर्गंधीचे साम्राज्य

रस्त्यावर केरकचरा दुर्गंधीचे साम्राज्य

डात्मक कारवाईची मागणी : मनपा आरोग्य विभाग

पंचवटी : कचरा जमा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने संपुर्ण शहरात घंटागाडी योजना सुरू केली असली तरी काही बेशिस्त नागरीक उघडयावर कचरा टाकत असल्याने रस्त्यावर कचर्‍याचे साम्राज्य पसरत आहे. महापालिका प्रशासन उघडयावर कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करते असे सांगते मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यानेच नागरीक उघडयावर कचरा टाकत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
पंचवटी विभागात प्रभागनिहाय घंटागाडया येत असल्या तरी बेशिस्त नागरीक सकाळच्यावेळी घंटागाडीत कचरा न टाकता घंटागाडी निघून गेल्यानंतर शिळे अन्न तसेच कचरा रस्त्यालगत आणून टाकतात त्यामुळे कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसुन येते. रस्त्यावर कचरा टाकणार्‍या बेशिस्त महिलांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असले तरी आरोग्य विभागाला कारवाई करण्यासाठी मुहूर्त लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्य रस्त्यालगत खरकटे अन्न तसेच कचरा टाकला जात असल्यामुळे रस्त्याने येजा करणार्‍या नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावर कचरा टाकून दुर्गंधी पसरविणार्‍या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
मोकाट जनावरांचा उपद्रव
परिसरातील मुख्य रस्त्यालगत बेशिस्त महिलांनी कचरा टाकून कचराकुंडया तयार केल्या आहेत. या कचरा कुंडीवर गाय, बैल, तसेच श्वान या सारखे मोकाट जनावरे ताव मारत असल्याने मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे.

Web Title: Street crochet deodorant empire