शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:44 IST

Delhi Stray Dog Attack news: जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू आणि प्रशिक्षक दिल्लीत दाखल झाले आहेत. स्पर्धेदरम्यान, केनियाचा धावपटू डेनिस मरागिया (Denis Maragia) हा आपल्या इव्हेंटपूर्वी तयारीसाठी 'कॉल रूम' जवळ असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला

देशाची राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या प्रतिष्ठित जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Para Athletics Championships)साठी जगभरातून खेळाडू, प्रेक्षक आलेले आहेत. परंतू, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशाच्या प्रतिमेला गालबोट लागल्याचा आरोप भाजपाने केला आहे. केनियाचा खेळाडू आणि परदेशी प्रशिक्षकांवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे स्पर्धेच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जागतिक पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू आणि प्रशिक्षक दिल्लीत दाखल झाले आहेत. स्पर्धेदरम्यान, केनियाचा धावपटू डेनिस मरागिया (Denis Maragia) हा आपल्या इव्हेंटपूर्वी तयारीसाठी 'कॉल रूम' जवळ असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा चावा घेतला. याशिवाय, इतर दोन घटनांमध्ये दोन परदेशी प्रशिक्षकांनाही स्टेडियम परिसरात भटक्या कुत्र्यांनी जखमी केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमींना तातडीने स्टेडियममधील वैद्यकीय कक्षात प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नेते विजय गोयल म्हणाले, "हा देशाच्या प्रतिष्ठेवर कलंक आहे. कुत्र्यांना रस्त्यावर सोडण्याचा आदेश देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आता याची जबाबदारी घेतील का? देशाची बदनामी होत आहे, जबाबदार कोण?". 

प्रशासकीय अनास्था उघड, आता धावपळ सुरूआंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेदरम्यान अशी घटना घडल्याने भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर क्रीडा मंत्रालय, दिल्ली सरकार आणि महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नवी दिल्ली महानगरपालिका (NDMC) आणि दिल्ली महानगरपालिकेने (MCD) स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून भटकी कुत्री पकडण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे.

विशेष पथके तैनात: स्टेडियम परिसरात श्वान पकडणारी चार कायमस्वरूपी पथके, एक रॅपिड रिस्पॉन्स युनिट आणि विशेष वाहने तैनात करण्यात आली आहेत.

रात्रीपासून कारवाई: घटनेच्या रात्रीपासूनच एका विशेष पथकाने कारवाई सुरू करून स्टेडियमच्या आतील सर्व कुत्र्यांना बाहेर काढले आहे.

या घटनेने पुन्हा एकदा दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आणि सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kenyan Athlete Attacked by Stray Dogs in Delhi; Security Injured

Web Summary : A Kenyan athlete and trainers were attacked by stray dogs during the Para Athletics Championships in Delhi. The incident raises concerns about safety and has sparked political criticism. Authorities have launched a dog-catching operation.
टॅग्स :dogकुत्राdelhiदिल्ली