शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी रणनीती; पंतप्रधान मोदींची अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:42 IST

सर्व राज्यांमध्ये भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढविणार आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत चर्चा करून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी दोन्ही नेत्यांसमवेत १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा व एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आपल्या निवासस्थानी बोलावून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोरामच्या निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीचा आढावा घेतला.भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, सर्व राज्यांमध्ये भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढविणार आहे. भाजपला सर्वांत जास्त अडचणींना राजस्थानमध्ये सामोरे जावे लागत आहे. तेथे वसुंधरा राजे यांच्याबाबत मोठा धोरणात्मक निर्णय भाजपला घ्यायचा आहे.

कोणत्या राज्यात कशी स्थिती ? - सूत्रांनी सांगितले की, भाजपने वसुंधरा राजेंबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. भाजप राजस्थानमध्ये सामूहिक नेतृत्वातच यावेळी निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत नंतर निर्णय होणार आहे. वसुंधरा राजे यांना यावेळी भाजप राजस्थान निवडणूक मोहिमेत मोठी जबाबदारी देऊ करणार आहे.- मध्य प्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार नाही. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना जास्त महत्त्व दिले जात आहे.- अशाच प्रकारे छत्तीसगढमध्येही भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंह यांनाही निवडणूक मोहिमेत मागे टाकण्यात आले आहे. - तेलंगणात भाजप बीआरएसविरोधात जास्त आक्रमक दिसत नाही. बीआरएसनेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीपासून अंतर राखलेले आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाह