बळजबरी खेदजनक!

By Admin | Updated: July 26, 2014 02:50 IST2014-07-26T02:50:24+5:302014-07-26T02:50:24+5:30

एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले

Strangers Sorry! | बळजबरी खेदजनक!

बळजबरी खेदजनक!

नवी दिल्ली : येथील महाराष्ट्र सदनातील निकृष्ट प्रतीच्या जेवणाबद्दल तक्रार करण्याच्या ओघात शिवसेनेच्या खासदारांनी रमजाननिमित्त रोजा ठेवलेल्या तेथील एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले असून, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास दिलेले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यास सरकार वचनबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली़
या घटनेचे बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते व यावर सरकारने निवेदन करावे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला होता. देशभरात संताप पसरविणारी ही घटना सत्ताधारी आघाडीतील शिवसेना या सर्वात मोठय़ा सहयोगी पक्षाच्या खासदारांशीच संबंधित असल्याने सरकार त्यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बव्हंशी वस्तुस्थिती निदर्शक असे निवेदन करून सरकारची सावध भूमिका मांडली. देशातील धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वानीच सतत प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सदस्यांना आवाहन केले.
ही घटना कशी व कशामुळे घडली याचा वस्तुनिष्ठ तपशील देऊन त्यांनी याप्रकरणी कोणीही पोलिसांत फिर्याद नोंदविलेली नसल्याने पुढे काहीच केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणो सूचित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुस्लीम युवकाच्या तोंडात चपाती कोंबून त्याचा रोजा मोडण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रमजान महिन्यात जातीय तेढ निर्माण करणा:या विचारे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक मुस्लीम बांधव धडकले होते.
 
राहुल यांचे टीकास्त्र
दादागिरीचे राजकारण करणा:या या पक्षांची विचारसरणीही अशीच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना खासदारांनी केलेल्या कृतीवर टीकास्त्र सोडले. अमेठीत पत्रकारांनी महाराष्ट्र सदनातील घटनेचा विषय छेडला तेव्हा राहुल म्हणाले, की ही विचारसरणी देशासाठी हानिकारक आहे.
 
च्महाराष्ट्र सदनात 23 जुलैला हा प्रकार घडल्यानंतर दुस:या दिवसापासून ‘आयआरसीटीसी’ने हे कंत्रट रद्द केले आहे व हा निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी कळविले आहे.
च्बळजबरीने चपाती कोंबल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. शिवसेनेच्या 11 खासदारांना अपात्र करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यात केली आहे. 
च्महाराष्ट्र सदनातल्या अनागोंदीविरु द्ध शिवसेनेने शुक्र वारी निवासी आयुक्त बिपिन मलिक यांच्याविरु द्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे दिला.
 

 

Web Title: Strangers Sorry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.