एक व्हिडीओ जो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सुरक्षा रक्षक काठ्या दंडुके घेऊन कारची तोडफोड करत आहे. ज्या कारची ते तोडफोड करत आहेत, ती ५० लाखांची मर्सिडीज आहे. हरयाणातील गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकांनी मर्सिडीज का फोडली याचीही स्टोरीही समोर आली आहे.
गुरुग्राममधील सेक्टर ३१ मधील सायबर पार्कमध्ये ही घटना घडली आहे. मर्सिडीज कारमधून तरुणीसोबत आलेल्या तरुणाचे नाव चमन डागर असून, तो इस्लामपूरचा आहे. या वादात चमन आणि सुरक्षा रक्षक अंकित जखमी झाले आहेत.
सुरक्षा रक्षक आणि तरुणाचा वाद का झाला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीसोबत मर्सिडीज कारमधून सायबर पार्क भागात आलेला चमन राँग साईडने कार घेऊन जात होता. सुरक्षा रक्षकाने त्याची कार अडवली. बाहेर पडण्याच्या मार्गाने आत जाता येणार नाही, असे सुरक्षा रक्षकाने त्याला सांगितले.
चमनने सुरक्षा रक्षकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकाने त्याला कार घेऊन जाण्यास विरोध केला. चमनने थेट सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. दोघांमध्ये मारामारी झाली. यात चमन आणि सुरक्षा रक्षक अंकित जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच झाडसा पोलीस ठाण्याचे अधिकारी तिथे आले. ते चमन आणि जखमी सुरक्षा रक्षकाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
मर्सिडीज कार फोडली
घटनेची माहिती कळताच इतर सुरक्षा रक्षक तिथे आले. तोपर्यंत चमन आणि अंकितला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. काही संतापलेल्या काही सुरक्षा रक्षकांनी उभ्या असलेल्या मर्सिडीजवर हल्ला केला. लाठ्या आणि दंडुक्यांनी सुरक्षा रक्षकांनी कारच्या काचा फोडल्या आणि कारचे नुकसान केले. हे घडल्यानंतर आणखी तणाव वाढला. मध्यरात्रीपर्यंत याप्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या प्रकरणात एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या. पोलीस आता सीसीटीव्हीच्या मदतीने आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून सर्वांगाने घटनेचा तपास करत आहेत. मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या लोकांविरोधात योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : In Gurugram, security guards damaged a ₹50 lakh Mercedes following an argument with the driver over wrong-side driving at Cyber Park. The driver allegedly assaulted a guard, leading to a violent reaction and property damage. Police are investigating the incident.
Web Summary : गुरुग्राम के साइबर पार्क में गलत साइड से गाड़ी चलाने पर बहस के बाद सुरक्षा गार्डों ने 50 लाख रुपये की मर्सिडीज को तोड़ दिया। कथित तौर पर ड्राइवर ने एक गार्ड पर हमला किया, जिसके कारण हिंसक प्रतिक्रिया हुई। पुलिस मामले की जांच कर रही है।