शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचं लग्न ठरलं?, आमदार अदिती सिंहनं अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 09:33 IST

राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

लखनौ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान या दोघांना ''तुम्ही लग्न कधी करणार?'', या प्रश्नाला वारंवार सामोरं जावं लागतं. अशातच, राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल गांधी आणि अदिती सिंह यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे या दोघांचं लग्न होणार असल्याचा दावा काही जण सोशल मीडियावर करत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी, अदिती सिंह आणि त्याच्या परिवारातील काही सदस्य दिसत आहेत. 'राहुल गांधींना अखेर जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत' असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

मात्र दुसरीकडे, राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंह यांनी खंडन केलं आहे.  याबाबत अदिती सिंह म्हणाल्या आहेत की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे मी प्रचंड हैराण झाले आहे. राहुल गांधी केवळ आमच्या पार्टीचे अध्यक्ष नाहीत, तर माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांचा खूप आदर करते. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे लग्नासंबंधीच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे सांगत अदिती सिंह यांनी अफवेबाबत खुलासा केला आहे. 

'कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता' असं सांगत अदिती सिंह यांनी विरोधकांकडे बोट दाखवलं आहे.

(जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?)

वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. यापूर्वी बॉक्सर विजेंदर सिगनं एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना सर्वांसमोरच लग्नासंबंधीचा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. विजेंदर सिंग लग्नासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे, जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा लग्न होईल'.  नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमादरम्यान विजेंदरनं राहुल गांधींना हा प्रश्न विचारला. यापूर्वीदेखील एका कार्यक्रमात जेव्हा राहुल गांधी यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले होते की, 'जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करणार'.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल