जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 08:34 AM2017-10-27T08:34:42+5:302017-10-27T09:07:51+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे  वय 47 वर्ष असून आताही ते बॅचलर आहेत. तरुणींमध्ये राहुल गांधींची क्रेझ असल्याचेही म्हटले जाते. मात्र वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो.

when boxer vijendra singh asked rahul gandhi over his marriage plans | जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?

जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?

Next

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे  वय 47 वर्ष असून आताही ते बॅचलर आहेत.  तरुणींमध्ये राहुल गांधींची क्रेझ असल्याचेही म्हटले जाते. मात्र वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. गुरुवारीदेखील एका कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिगनं राहुल गांधी यांना सर्वांसमोरच लग्नासंबंधीचा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. 
विजेंदर सिंग लग्नासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे, जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा लग्न होईल'.  नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमादरम्यान विजेंदरनं राहुल गांधींना हा प्रश्न विचारला. यापूर्वीदेखील एका कार्यक्रमात जेव्हा राहुल गांधी यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले होते की, 'जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करणार'.

दरम्यान, यावेळी बॉक्सर विजेंदर सिंगनं राजकीय नेते खेळांमध्ये का रस दाखवत नाही? असा सवाल विचारला, यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी एक गुपित उघड केले. जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या आईकिदो नावाच्या खेळात ब्लॅक बेल्ट मिळवल्याचं राहुल गांधींनी सांगितले. मी जाहीररित्या कुठल्याही खेळाबद्दल बोलत नसलो, तरी क्रीडा हा माझ्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले.

Web Title: when boxer vijendra singh asked rahul gandhi over his marriage plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.