खासगी भाडी मारणार्‍यांवर आळा घ

By Admin | Updated: April 11, 2015 01:40 IST2015-04-11T01:40:53+5:302015-04-11T01:40:53+5:30

ाला

Stop the private lenders d | खासगी भाडी मारणार्‍यांवर आळा घ

खासगी भाडी मारणार्‍यांवर आळा घ


फोंडयातील मारूती टॅक्सी असोसिएशनची मागणी
फोंडा:
सरकार दरबारी टॅक्सी म्हणून नोंदणी असलेल्या वाहनांना डावलून पर्यटक पर्यटन स्थळी जाण्यासाठी तसेच कंपनी, हॉटेल्सकडे जाण्यासाठी कमी भाडे आकारणार्‍या खासगी वाहनांचा वापर केला जात असल्यामुळे टॅक्सी म्हणून नोंद असलेल्या वाहनचालकांना भाडे मिळत नसून हे टॅक्सी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्यटकांना कमी दरात भाडे उपलब्ध करून टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय ठेवू पहाणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी फोंडयातील मारूती टॅक्सी असोसिएशनच्या समितीने आज फोंडयात पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला मारूती टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष बबन सावंत, सचिव चिरंजीवी राव, खजिनदार संतोष केरकर, माजी अध्यक्ष रत्नदीप नाईक, राजेश डांगी, राजू बोरकर व इतर टॅक्सीचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष बबन सावंत यांनी खासगी भाडी मारणार्‍या वाहनांमुळे टॅक्सी चालकांपुढे संकट अभे राहिले असून यासंदर्भात फोंडा वाहतूक पोलीस तसेच आरटीओ कार्यालयात तक्रारही करण्यात आली आहे. सदर तक्रारीनुससर आरटीओ तर्फे खासगी भाडी मारणार्‍यांवर कारवाई केली जाते. मात्र त्यांना तात्पुरती कारवाई करून सोडले जाते. त्यामुळे टॅक्सी चालकांना भाडे मिळणे कठीण बनल्याचे ते म्हणाले.
खासगी भाडे मारणार्‍यांमुळे टॅक्सी चालकांना दिवसभर उन पावसात राहूनही एकही भाडे मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे. त्यात असोसिएशनच्या सदस्यांकडुन सरकारला वार्षिक कर, पर्यटक कर, वाहन पासिंग व मोठया प्रमाणात इंश्योरंसचे पैसे भरावे लागतात. मात्र एवढे करूनही खासगी वाहनचालक भाडयावर डल्ला मारीत असल्यामुळे या टॅक्सी चालकांवर हतबल होण्याची पाळी आल्याचे यावेळी बबन सावंत यांनी सांगितले.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष रत्नदीप नाईक यांनी सांगितले की, सरकारने नेमून दिलेल्या दरानुसार पर्यटक टॅक्सी चालक भाडे मारतात. मात्र खासगी वाहनचालक या टॅक्सी चालकांपेक्षा शंभर दीडशे रूपये कमी आकारत असल्यामुळे सहाजिकच पर्यटक वा कंपन्यांचे अधिकारी खासगी वाहने नेणे पसंत करतात. सरकारने आता खासगी भाडी मारणार्‍यांवर कारवाई करून टॅक्सी चालकांना भाडी मारण्यासाठी क्रमांकवार नंबर द्यावेत. या संदर्भात मुख्र्यमंत्री पार्सेकरांशी बोलणी झाली असुन त्यांनी पंधरा दिवसांची मुदत मागितली आहे. या पंधरा दिवसात सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर असोसिएशन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
(प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 10- स्रङ्मल्ल-04
कॅप्शन - फोंडयात पत्रकार परिषदेत माहिती देताना मारूती टॅक्सी असासिएशनचे सदस्य. (छाया- शेखर नाईक)








Web Title: Stop the private lenders d

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.