राहु परिसरातील अवैद्य धंदे बंद
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30
करण्यासाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात

राहु परिसरातील अवैद्य धंदे बंद
क ण्यासाठी बेमुदत उपोषणाला सुरुवातराहु : राहु (ता. दौंड) परिसरातील अवैद्य धंदे व बेकायदेशीर दारुबंदे व परमिट रुम बंद करण्यासाठी माहिती सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. (दि. २५) राहु बेटातील पिलाणवाडी येथिल दोन परमीट रुम विरोधात हे उपोषण आसल्याचे विठ्ठल थोरात यांनी सांगितले उपोषणाचा पहिल्याच दिवशी सामाजीक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार यांनी या अमरण उपोषणाला उस्थीत राहून पाठिंबा दिला. यावेळी सरदार म्हणाल्या की युवकांनी एक जुट बंाधली तर बेकायदेशीर दारुधंद्याला आळा घालणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे वसुधाताई सरदार यांनी व्यक्त केले.यावेळी सेवासमितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, महाराष्ट्र राज्य सेवा समिती राज्य संघटक सुनिल जाधव, बबलु गालिपण, मधुकर खुडे, दिपक आहिरे, यांनी उपोषणाला पाठिबा दिला. निवेदनात विठ्ठल थोरात यांनी म्हटले आहे की पिलाणवाडी येथील एक हॉटेल व सुभाष झरांडे यांनी दिलेली शासकीय परवान्याबाबत कागदपत्रात त्रृटी असताना हे परवाने कसे आणि का देण्यात आले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. उपोषणस्थळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी भेट दिली. दरम्यान बेकायदेशीर दारुधंद्यावर कारवाई केली जाईल असे सांगुन नवीन बियरबार लायसन मिळविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्क नाही असे अधिकार्यांनी सांगितले. --------------