मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:33 PM2022-08-21T20:33:40+5:302022-08-21T20:36:49+5:30

Attack On CM Convoy : या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात घडली, जिथे काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.

stones pelted on cm nitish kumars convoy in patna | मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

Next

नवी दिल्ली : बिहारची (Bihar) राजधानी पाटणामध्ये (Patna) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या ताफ्यावर (Convoy) दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही वाहनांच्या काचा फुटल्या  आहेत. दगडफेकीच्या वेळी मुख्यमंत्री नितीश कुमार ताफ्यात नव्हते. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात घडली, जिथे काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.

या ताफ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारीच उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. ते तेथील दुष्काळी परिस्थितीबाबत बैठक घेणार आहे. तसेच, याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या रबर डॅमचीही पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री नितिश कुमार हेलिकॉप्टरने गयाला जाणार आहेत, पण हेलिपॅडवरून इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची गाडी पटनाहून गयाला पाठवली जात होती.

दगडफेकीत काही जण जखमी
एका तरुणाच्या हत्येमुळे संतप्त लोकांनी पाटणा-गया  (Patna-Gaya) मुख्य मार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. याच आंदोलनादरम्यान कारकेडच्या गाड्या रस्त्यावरून जाऊ लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी ताफ्यावर (Convoy)दगडफेक केली. त्यामुळे अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे काही जण जखमीही झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: stones pelted on cm nitish kumars convoy in patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.