ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये दगडफेक; दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 13:05 IST2019-06-05T13:04:28+5:302019-06-05T13:05:08+5:30
तरुणांनी ईदच्या दिवशी नमाज पठन करून भारत विरोधी नारे देण्यास सुरुवात केली.

ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये दगडफेक; दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावले
श्रीनगर : एकीकडे देशभर शांततेत ईद साजरी केली जात असताना काश्मीरमध्ये आजही शांती लाभलेली नाही. तेथील दहशतवादी झाकीर मुसाचे समर्थन करणाऱ्या चेहरा झाकलेल्या तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. श्रीनगरच्या जामिया मशीदीजवळ हा प्रकार घडला आहे.
या तरुणांनी ईदच्या दिवशी नमाज पठन करून भारत विरोधी नारे देण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांच्या कारवाईत ठार झालेला दहशतवादी झाकीर मुसा आणि मसूद अझहरचे पोस्टर झळकावले. या पोस्टरवर मुसा आर्मी, काश्मीर बनेल पाकिस्तान असे लिहिले होते.
गेल्या महिन्यात एका चकमकीवेळी हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसा ठार झाला होता. तो A++ प्रकारातील दहशतवादी होता. त्याच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. झाकीर मुसा दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुराच्या त्राल भागातील राहणारा होता.