चोरट्यांनी फोडले मेडिकल
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:29+5:302015-08-16T23:44:29+5:30
रोख अन् औषधेही लंपास

चोरट्यांनी फोडले मेडिकल
र ख अन् औषधेही लंपास नागपूर : रामनगरातील शिवमंदिर जवळ असलेल्या गायत्री मेडिकलचे शटर तोडून चोरट्यांनी आतमधील रोख १३ हजार आणि १ लाख, ८० हजारांचे औषधे चोरून नेली. या अफलातून चोरीमुळे पोलीसही चक्रावले आहेत. गजानन मारोतराव डोंगरे (वय ४७, रा. हिलटॉप) यांचे रामनगरातील शिवमंदिराजवळ गायत्री मेडिकल स्टोअर्स आहे. १४ ऑगस्टला डोंगरेंनी ते दुकान बंद केले. शनिवारी स्वातंत्र्यदिनामुळे त्यांनी दुकान उघडले नाही. रविवारी सकाळी १०.३० वाजता ते दुकानात गेले असता ही चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गोळ्या-औषधे तसेच रोख १३ हजार रुपये असा एकूण १ लाख, ९३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. डोंगरे यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. औषध चोरून नेणारा चोर एखाद्या रुग्णाचा नातेवाईक असावा, असा पोलिसांचा संशय आहे.