देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाचे पाकीट चोरले

By Admin | Updated: March 23, 2017 17:15 IST2017-03-23T17:15:10+5:302017-03-23T17:15:10+5:30

नाशिक : सीबीएस, महामार्ग, मेळा या बसस्थानकांवर प्रवाशांची पाकिटे चोरणार्‍या चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ परगावाहून आलेल्या प्रवाशांचे खिसे कापण्याचे काम या चोरट्यांकडून केले जात असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे़ दरम्यान, पनवेल येथून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळास्थानकावर आलेल्या भाविकाच्या खिशातील पाकीट चोरट्यांनी चोरून नेले असून, त्यामध्ये २० हजार रुपयांची रोकड होती़

Stole the wallet of the devotee who visited the scene | देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाचे पाकीट चोरले

देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाचे पाकीट चोरले

शिक : सीबीएस, महामार्ग, मेळा या बसस्थानकांवर प्रवाशांची पाकिटे चोरणार्‍या चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे़ परगावाहून आलेल्या प्रवाशांचे खिसे कापण्याचे काम या चोरट्यांकडून केले जात असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे़ दरम्यान, पनवेल येथून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळास्थानकावर आलेल्या भाविकाच्या खिशातील पाकीट चोरट्यांनी चोरून नेले असून, त्यामध्ये २० हजार रुपयांची रोकड होती़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेलच्या सिडको कॉलनीतील रहिवासी मानसिंग चव्हाण हे शनिवारी (दि़ १८) कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आले होते़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानकातून त्र्यंबकेश्वर बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पाकीट चोरले़ या पाकिटामध्ये २० हजार रुपयांची रोकड, वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रे होती़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Stole the wallet of the devotee who visited the scene