शेअर बाजारांची उड्डाणांवर उड्डाणो!
By Admin | Updated: July 25, 2014 00:47 IST2014-07-25T00:47:57+5:302014-07-25T00:47:57+5:30
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) प्रवाह कायम राहिल्याने गुरुवारीही बाजारात सलग आठव्या दिवशी तेजीचा कल कायम राहिला.

शेअर बाजारांची उड्डाणांवर उड्डाणो!
मुंबई : सरकारच्या विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या प्रयत्नांच्या पाश्र्वभूमीवर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) प्रवाह कायम राहिल्याने गुरुवारीही बाजारात सलग आठव्या दिवशी तेजीचा कल कायम राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 125 अंकांनी उंचावून 26,271.85 अंकांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही प्रथमच 7,8क्क् च्या पातळीवर गेला.
चीनच्या बांधकाम क्षेत्रबाबत सकारात्मक आकडेवारी आल्यानेही आशियाई बाजार धारणा मजबूत झाली.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् कंपन्यांचा सहभाग असलेला सेन्सेक्स दुपारी नकारात्मक कक्षेत राहिल्यानंतर शेवटच्या तासात मागणी वाढल्याने 124.52 अंक क्.48 टक्क्याने वाढून 26,271.85 अंकांच्या नव्या विक्रमावर बंद झाला. यापूर्वी काल सेन्सेक्स 26,147.33 अंकांच्या उच्चंकावर बंद झाला होता. सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारात 26,292.66 अंक या नव्या उच्चंकालाही स्पर्श केला. 8 जुलै रोदी सेन्सेक्सने 26,19क्.44 अंक या विक्रमी पातळीला स्पर्श केला होता.
सलग आठ दिवसांपासून बाजारात तेजी आहे. यादरम्यान सेन्सेक्समध्ये 1,265 अंकांची वाढ नोंदली गेली. सप्टेंबर 2क्12 नंतर सेन्सेक्समध्ये तेजीचा सर्वाधिक लांब चालू आहे. यंदा आतार्पयत सेन्सेक्समध्ये 24 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 34.85 अंक वा क्.45 अंकाच्या लाभासह प्रथमच 7,8क्क् अंकांच्या 7,83क्.83 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने 7,835.65 अंक या विक्रमालाही स्पर्श केला. गेल्या आठ दिवसांत निफ्टीमध्ये 375.45 अंकांची वाढ नोंदली गेली.
धातू, माहिती तंत्रज्ञान व एफएमसीजी शेअर्सना मागणी राहिली. टिकाऊ ग्राहक वस्तू, औषधी आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र नफोखोरी झाली. सेन्सेक्सवरील आयटीसी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिंदाल्को व विप्रो या कंपन्यांना तेजीचा लाभ झाला.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सेन्सेक्स थोडासा खाली आला होता. नंतर मात्र तो सातत्याने तेजीमध्ये आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे बाजारात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. विशेषत: विदेशई गुंतवणूकदार बाजाराकडे आकर्षित होत आहेत. (प्रतिनिधी)
4केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विमा क्षेत्रत थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून 49 टक्के करण्यास मंजुरी दिली. यामुळे या क्षेत्रत सुमारे 25,क्क्क् कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक येईल. याशिवाय सरकार रेल्वे व संरक्षण क्षेत्रत एफडीआय आणखी उदार बनविण्यावर लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे. याचा बाजार धारणोवर सकारात्मक परिणाम झाला.
4सेन्सेक्सवरील 3क् पैकी 21 कंपन्यांना तेजीचा लाभ झाला, तर 9 कंपन्यांना फटका बसला. व्हेरासिटी ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सकारात्मक धारणोमुळे देशी बाजाराला बळ मिळाले. गेल्या तीन दिवसांत एफआयआयने 1,225 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली आहे.