शेअर बाजाराची उसळी
By Admin | Updated: June 30, 2014 22:45 IST2014-06-30T22:45:34+5:302014-06-30T22:45:34+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक सुधारणा मजबुतीने राबविणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे शेअर बाजारांनी आज पुन्हा एकदा उसळी घेतली.

शेअर बाजाराची उसळी
>मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक सुधारणा मजबुतीने राबविणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे शेअर बाजारांनी आज पुन्हा एकदा उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 314 अंकांनी उसळून 25,413.78 अंकांवर बंद झाला. या तिमाहीने केलेली कामगिरी गेल्या 5 वर्षातील सर्वोत्तम ठरली आहे.
बाजारातील सूत्रंच्या मते, जागतिक पातळीवर कच्च तेलाच्या किमती काही प्रमाणात उतरल्या आहेत. त्याचा परिणामही बाजार धारणोवर दिसून आला. आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी, ओएनजीसी, एचडीएफसी, सन फार्मा, एसबीआय, टीसीएस, इन्फोसिस आणि एचडीएफसी या कंपन्यांना आजच्या तेजीचा सर्वाधिक लाभ मिळाला.
सकाळी बाजार उघडला तो तेजीनेच. 30 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सुरुवात चढत्या आलेखाने झाली. एका टप्प्यावर बाजार 25,460.96 अंकांर्पयत वर गेला होता. नंतर तो थोडा खाली येऊन 313.86 अंकांच्या अथवा 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 25,413.78 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 37 अंकांनी वाढला होता.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही आज 102.55 अंकांनी वाढला. निफ्टीची ही वाढ 1.37 टक्के आहे. त्याबरोबर निफ्टीने 7,600 अंकांच्या वर पाऊल टाकले. दिवस अखेरीस तो 7,611.35 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारांतही आज तेजीचे वातावरण दिसून आले. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान या आशियाई बाजारांत 0.44 टक्के ते 0.93 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. सिंगापुरातील बाजार मात्र आज मंदीत होते. युरोपातील बाजार सुरुवातीला संमिश्र कल दाखवीत होते.
देशांतर्गत बाजारातील मुख्य असलेल्या सेन्सेक्समधील 30 पैकी 24 कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. त्यांचे शेअर्स वर चढले. 6 कंपन्या मात्र या तेजीतही मंदी दर्शवित होत्या. त्यांचे शेअर्स कोसळले. तेजीचा सर्वाधिक 3.87 टक्क्यांचा लाभ सन फार्माला मिळाला, तर मंदीचा सर्वाधिक 1.02 टक्के फटका बजाज ऑटोला बसला. (प्रतिनिधी)
430 जूनला संपलेल्या तिमाहीत सेन्सेक्सने 3,027.51 अंकांची कमाई केली आहे. ही वाढ 13.5 टक्के आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे.
4सरकार बदलल्यानंतर शेअर बाजारातील भांडवलाचा प्रवाह लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारात तेजी आली आहे. एकटय़ा जून महिन्यात सेन्सेक्स 1,196 अंकांनी वाढला आहे.
4रेलिगेअर सिक्योरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उलटी गिणती सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांची नजर सध्या अर्थसंकल्पपूर्व तेजीवर आहे.