स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी बनली 'कमला', महाकुंभमध्ये होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:27 IST2025-01-10T17:24:08+5:302025-01-10T17:27:56+5:30
महायकुंभमध्ये स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वामी कैलाशानंद महाराज यांनी दिली.

स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी बनली 'कमला', महाकुंभमध्ये होणार सहभागी
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा. काही दिवसातच महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. या कुंभ मेळाव्यात जगभरातील दिग्गज लोक सहभागी होणार आहेत. अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स सहभागी होणार आहेत. ६१ वर्षीय लॉरेन जॉब्स १३ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये पोहोचणार आहेत.
नेपाळमार्गे चीनला पाठवले जाणारे लाखो रुपयांचे मानवी केस जप्त; ३ तस्करांना अटक
लॉरेन जॉब्स या १३ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये येणार असून २९ जानेवारीपर्यंत निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरामध्ये राहणार आहेत. स्वामींनी त्यांना त्यांचे गोत्र दिले आहे. त्यांचे नाव 'कमला' ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन जॉब्स याआधीच्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. त्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात. कुंभ व्यतिरिक्त, त्यांचे भारतात काही वैयक्तिक कार्यक्रम आहेत, यामध्ये त्या सहभागी होणार आहेत. २०२० च्या फोर्ब्स अंकात जगातील अब्जाधीशांच्या यादीत लॉरेन जॉब्स ५९ व्या क्रमांकावर होत्या.
जगातील अनेक दिग्गज सहभागी होणार
स्वामी कैलाशानंद यांनी माध्यमांना सांगितले की, लॉरेन जॉब्स यांच्या सहीत जगभरातील अनेक दिग्गज लोक कुंभमेळाव्यात सहभागी होणार आहेत. आम्ही या सगळ्यांचे स्वागत करणार आहे. लॉरेन जॉब्स या कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. यासह त्या आपल्या गुरुंनाही भेटणार आहेत. स्वामींनी त्यांना गोत्र दिले आहे, त्यांचे नाव कमला असं ठेवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभ मध्ये लॉरेन जॉब्स कल्पवास देखील करणार आहेत. हिंदू धर्मामध्ये कुंभ आणि माघ महिन्यात साधुंसह गृहस्थांसाठी कल्पवासची परंपरा आहे. या काळात गृहस्थांना शिक्षण आणि दिक्षा दिली जाते. यासाठी काही नियम आणि धार्मिक मान्यता असतात.