शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:00 IST

न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या पीठाने सांगितले की, अनेकदा सावत्र आई मुलाचा सांभाळ तिच्या खऱ्या आईप्रमाणेच करते, त्यामुळे तिला 'डी-फॅक्टो मदर' म्हणजेच प्रत्यक्ष आई मानले पाहिजे.

नवी दिल्ली: 'आई' या शब्दाचा अर्थ आणखी व्यापक करण्याची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. सामाजिक कल्याण योजना आणि पेन्शनमध्ये सावत्र आईचाही 'आई' म्हणून समावेश केला पाहिजे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय हवाई दलाला केले आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या पीठाने सांगितले की, अनेकदा सावत्र आई मुलाचा सांभाळ तिच्या खऱ्या आईप्रमाणेच करते, त्यामुळे तिला 'डी-फॅक्टो मदर' म्हणजेच प्रत्यक्ष आई मानले पाहिजे.मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांतच जर त्याची आई वारली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले, तर ती सावत्र आईच त्या मुलाचा आयुष्यभर सांभाळ करते. अशा परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत तुम्ही तिला सावत्र आई म्हणू शकता, पण खरे तर तीच त्या मुलाची खरी आई असते.

हवाई दलाच्या नियमांवर न्यायालयाचे प्रश्नचिन्हसर्वोच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली आहे. तिच्या मुलाचे हवाई दलात असताना निधन झाले. तिने आपल्या सावत्र मुलाला लहानपणापासून वाढवले असून आणि आता ती पेन्शनची मागणी करत आहे. मात्र, भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार 'आई'च्या व्याख्येत सावत्र आईचा समावेश होत नाही. त्यामुळे हवाई दलाच्या वकिलांनी पेन्शन देण्यास नकार दिला. यावर न्यायालयाने हवाई दलाच्या नियमांनाच आव्हान दिले. 

'आई' हा शब्द खूप मोठा आहे आणि फक्त जन्मदाती आईच मुलाला वाढवते असे नाही. सध्याच्या काळात अनेकदा सावत्र  आईच मुलाचा सांभाळ करते. त्यामुळे पेन्शन किंवा इतर कोणत्याही फायद्यासाठी सावत्र आईच्या दाव्याचा सरकारने सहानुभूतीने विचार करायला हवा आणि नियमांमध्ये बदल करायला हवेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.  सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि हवाई दलाला यावर लवचिक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या प्रकरणात काय निर्णय येतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPensionनिवृत्ती वेतन