सेनला वाचविणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

By Admin | Updated: August 25, 2014 04:22 IST2014-08-25T04:22:27+5:302014-08-25T04:22:27+5:30

कोट्यवधींच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने रविवारी एका चहा मळ्याचा मालक आणि व्यापारी संधिर अग्रवाल याला कोलकाता येथे अटक केली.

Stenes to save the businessman Sen. | सेनला वाचविणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

सेनला वाचविणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

नवी दिल्ली : कोट्यवधींच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने रविवारी एका चहा मळ्याचा मालक आणि व्यापारी संधिर अग्रवाल याला कोलकाता येथे अटक केली.
सीबीआयने आधी अग्रवालला ताब्यात घेऊन मुख्य आरोपी आणि कंपनीचा चेअरमन सुदीप्ता सेन तसेच ईस्ट बंगाल क्लबचा अधिकारी देवव्रत सरकार या दोघांसोबत बसवून चौकशी केली आणि अग्रवाल हादेखील या घोटाळ्यात सामील असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला अटक केली.
अग्रवाल हा या भागातील मोठा व्यापारी आहे आणि त्याचे राजकीय व अन्य व्यापाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत. अग्रवाल याने सेबी व अन्य संस्थांशी असलेल्या आपल्या संबंधाचा फायदा घेऊन सुदीप्ता सेन याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या अटकेमुळे तपासाला बळ मिळाले आहे.
अग्रवाल हा सेबी आणि अन्य संस्थांमध्ये मध्यस्थ म्हणून कार्यरत होता आणि सेन याच्याविरुद्ध कारवाई होऊ नये यासाठी त्याने प्रयत्न केले होते, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Stenes to save the businessman Sen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.