शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खांबांच्या आड राहून मोबाईल चोरी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

खांबांच्या आड राहून मोबाईल चोरी

खांबांच्या आड राहून मोबाईल चोरी
लोकल प्रवासात दरवाजाजवळ उभे राहणार्‍या प्रवाशांना धोका
मध्य रेल्वे आरपीएफकडून २७ धोकादायक ठिकाणाची यादी तयार
मुंबई - लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाईलवर बोलणार्‍या प्रवाशांनो सावधान. लोकल प्रवासात ट्रॅकवर उभे राहून चोरांकडून मोबाईल चोरीची नवी शक्कल लढवली जात आहे. प्रवासात दरवाजाजवळ उभे राहणार्‍या प्रवाशाच्या हातावर दंडुक्याने फटका मारुन मोबाईल चोरले जात असून अशा धोकादायक ठिकाणांची मध्य रेल्वे आरपीएफकडून यादीच तयार करण्यात आली आहे. यात चोरांकडून ट्रॅकवरील खाबांची आधार घेण्यात येत असून अशा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी आरपीएफकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे.
मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बरवरुन प्रवास करताना अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजाजवळ उभे असतात. यात काही प्रवासी मोबाईलवर बोलत दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करतात. अशा प्रवाशांना हेरुन चोरांकडून दंडुक्याच्या सहाय्याने फटका मारुन मोबाईल चोरी केली जात आहे. यात मोबाईल ट्रॅकवर पडल्यानंतर चोर मोबाईल लंपास करतात. अशा घटनां मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत असून त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे आरपीएफने व्यूहरचना आखली आहे. या प्रकारे होणार्‍या चोर्‍यांच्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट तयार करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवर असे २७ धोकादायक ठिकाणे असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. कल्याण स्थानकाजवळ सहा, डोंबिवलीजवळ दोन, नाहूर-मुलुंडजवळ आठ, पनवेलजवळ एक, तुर्भेजवळ सात आणि ठाणे स्थानकाजवळ तीन धोकादायक ठिकाणे आहेत. या ठिकाणी आरपीएफकडून पाळत ठेवण्यात आली असून अशी २0 गुन्हे उघडकीस आली आहेत. यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये १७ ते ३0 वयोगटातील आरोपींचा समावेश आहे. त्यांच्यावर याआधीही बरेच गुन्हे असल्याचे सांगण्यात आले.
........................................

मोबाईलची स्वस्तात विक्री
मोबाईल चोरल्यानंतर त्याची स्वस्तात विक्री चोरांकडून केली जाते. एखादया मोबाईल शॉपला विकतानाच मोबाईलचे फॅड असणार्‍या विद्यार्थ्यांनाही ते विकले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
.............................

आरोपींकडून चैन चोरीच्याही घटना
पकडलेल्या आरोपींकडून चैन चोरीच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
..................................


सचिन भालोदे (मध्य रेल्वे- वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)- या घटना बर्‍याच निदर्शनास आल्या आहेत. त्याविरोधात कारवाई केली जात आहे. अशी ब्लॅक स्पॉटची यादीच तयार करण्यात आली असून रेल्वे पोलिसांकडून त्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे.