Statue Of Unity: आता हेलिकॉप्टरमधून पाहता येणार स्टॅच्यू ऑफ युनिटी, जाणून घ्या तिकिटाचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:35 PM2018-12-25T15:35:16+5:302018-12-25T15:42:15+5:30

पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे.

Statue Of Unity: helicopter ride to get a panoramic view of Statue of Unity | Statue Of Unity: आता हेलिकॉप्टरमधून पाहता येणार स्टॅच्यू ऑफ युनिटी, जाणून घ्या तिकिटाचा दर

Statue Of Unity: आता हेलिकॉप्टरमधून पाहता येणार स्टॅच्यू ऑफ युनिटी, जाणून घ्या तिकिटाचा दर

ठळक मुद्देजगातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे.जगातील सर्वात मोठी प्रतिमा असलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला हेलिकॉप्टरमधूनही पाहायला मिळणार आहे.

गुजरातः नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली जगातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी प्रतिमा असलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला हेलिकॉप्टरमधूनही पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राइड लाँच करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अवकाशातून तुम्हाला फक्त 10 मिनिटांत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी 2900 रुपये मोजावे लागणार आहेत.

तसेच हेलिकॉप्टरमधून तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीशिवाय व्हॅली ऑफ फ्लॉवर आणि सरदार सरोवर बांध पाहू शकणार आहात. ही राइड स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या हेलिपॅडपासून सुरू होणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला अवकाशातून पाहण्यासाठी संधी हवाई सर्व्हिस हेरिटेज एव्हिएशननं उपलब्ध करून दिली आहे. या सेवेची सुरुवात करणारे ब्रीजमोहन म्हणाले, आतापर्यंत आम्ही उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात लोकांना राइडवर नेलं होतं. परंतु आता गुजरात सरकारच्या मदतीनं सरदार सरोवर बांध आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवणार आहोत. एका वेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 ते 7 जण बसू शकणार आहेत. 

कसं कराल बुकिंग
ब्रीजमोहन सांगतात, हेलिकॉप्टर सुविधा सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी 55 जणांनी या राइडची मजा घेतली. पहिल्या टप्प्यात एकच हेलिकॉप्टर ठेवण्यात आलं होतं. जर प्रवासी जास्त असले तर दोन हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच गुजरात टुरिझमच्या वेबसाइटवरूनही या राइडचं बुकिंग करता येणार आहे. सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. येथे उभारण्यात आलेली सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  31 ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाले होते. मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. 

Web Title: Statue Of Unity: helicopter ride to get a panoramic view of Statue of Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.