आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 09:58 PM2018-12-05T21:58:00+5:302018-12-05T22:02:26+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 महापरिनिर्वाण दिन आहे.

Statue of Babasaheb Ambedkar vandalised in andhra pradesh | आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

आंध्र प्रदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

googlenewsNext

हैदराबाद - एकीकडे देशात महामपरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यासाठी विशेषत: मुंबईतील दादर चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर उसळला आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील एका गावात काही अज्ञात समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. त्यामुळे दलित समाजात रोष निर्माण झाला आहे. तर या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 महापरिनिर्वाण दिन आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तर देशाच्या काही भागांतून मुंबईतील दादर चैत्यभूमीवर जनसागर उसळला आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, आंध्र प्रदेशमधील पोडागंतयाडा भागात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांच्या मनात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. त्यामुळेही अनेक भीमसैनिकांच्या भावना दुखावल्या होत्या.        

 


Web Title: Statue of Babasaheb Ambedkar vandalised in andhra pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.