शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुगलांची नावे इतिहासातून हटवणार, भाजपा आमदारांचे वक्तव्य; ताजमहालविषयीही विचारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:10 IST

भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) : भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.ते म्हणाले की, ज्या सम्राटाने आपल्या वडिलांना तुरुंगात बंद केले होते आणि हिंदुंना लक्ष्य केले होते त्या सम्राटाने हा ताजमहाल उभारला आहे. त्यामुळे मुगल सम्राटांची नावे मिटविण्यासाठी इतिहास नव्याने लिहिण्यात येईल.इतिहास मात्र, नेमका याच्या उलट आहे. शाहजहां यांनी आपली पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला होता. शाहजहां यांचे पुत्र औरंगजेबाने त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात शाहजहां यांना तुरुंगात बंद केले होते. पण आमदार सोम म्हणाले की, मुगल सम्राट बाबर, अकबर आणि औरंगजेब यांची नावे इतिहासातून हटविण्याचे काम सरकार करीत आहे. उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन पुस्तकात ताजमहालचा समावेश केलेला नाही.या पार्श्वभूमीवर सिसोली गावात ते म्हणाले की, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांबाबत शाळा, महाविद्यालयातून शिक्षण द्यायला हवे. (वृत्तसंस्था)ताजमहाल यापुढे पाहायचा नाही का?हैदराबाद : भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सवाल केला आहे की, ताजमहाल पाहण्यासाठी जाऊ नका, असे आवाहन सरकार पर्यटकांना करणार आहे काय?, असा सवाल केला आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार विश्वासघातकी असलेल्या लोकांनी लाल किल्लाही बनविला आहे. या ठिकाणी झेंडावंदन करणे मोदी बंद करणार आहेत का? असा प्रश्नही ओवैसी यांनी विचारला.

टॅग्स :Taj MahalताजमहालBJPभाजपा